शिरूर बाजार समितीचे काम आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:32+5:302021-07-09T04:08:32+5:30
मुंबई येथे मंत्रालयात शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे ...
मुंबई येथे मंत्रालयात शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, माजी सभापती प्रकाश पवार, किशोर दांगट हे उपस्थित होते.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांच्या संकल्पनेतून शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गेली ६४ वर्षांत केलेल्या शेतकरी हिताच्या कामाचा आढावा घेण्यात आला असून, त्यामध्ये शिरूर तालुक्याचा समग्र इतिहास, शेती तज्ज्ञांचे शेतीविषयक लेख याचा समावेश आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सहकारी संस्थांनी आदर्शवत काम करून शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत.
आमदार अशोक पवार म्हणाले की, बाजार समितीने प्रकाशित केलेल्या स्मरणिकेमुळे तालुक्यातील जनतेला समग्र इतिहास खऱ्या अर्थाने समजणार असून, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, या स्मरणिकेमुळे नवीन पिढीला तालुक्यातील सहकारी संस्थेच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाची माहिती घेऊन नवीन नेतृत्व तयार होतील.
सर्वांचे आभार शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी मानले.
०८ टाकळी हाजी स्मरणिका
शिरूर बाजार समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, पोपटराव गावडे व इतर.