सामाजिक बांधिलकीतून कामे करा : धर्माधिकारी
By admin | Published: February 17, 2015 11:34 PM2015-02-17T23:34:16+5:302015-02-17T23:34:16+5:30
स्व:ताचे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या वाटेला दु:ख येऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचे काम गौरवास्पद आहे,’’
दौंड : ‘‘स्व:ताचे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या वाटेला दु:ख येऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचे काम गौरवास्पद आहे,’’ असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टच्या वतीने दौंड येथील राज्यस्तरंीय गुणवंत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
माजी आमदार रंजना कुल यांनी रोहिणी जाधव ट्रस्टच्या कामाचा गौरव करून भविष्यात या संस्थेला मदत करण्याचा संकल्प केला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी गेल्या १९ वर्षांच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात झाडांच्या रोपांना मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आले. तसेच पुणे येथील सायली गुजर यांच्या रेड लाईट विभागातील लहान मुलांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला.
तर, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या पथकाने सलग ७ वर्ष पर्यावरण जागृती व संवर्धनाचा शासनाचा पुरस्कार मिळवल्याबद्दल या संस्थेचा गौरव अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया, डॉ. प्रेमकुमार भट्टड, अॅड. अशोक मुनोत, डॉ. राजेंद्र माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, विविध क्षेत्रांतील गौरवमूर्तींची नावे पुढील प्रमाणे : सामाजिक पुरस्कार :- प्रकाश देशपांडे (पुणे), सायली गुजर (पुणे), महेश निंबाळकर (इंदापूर), प्रमोद खांगल (दौंड), प्रल्हाद जाधव (दौंड), रक्तदाता पुरस्कार :- अविनाश पुरंदरे, अतुल पुरंदरे (बारामती), रिटा शेटिया (पुणे), रक्तमित्र पुरस्कार :- अविनाश वैद्य (चिंचवड), एड्स जनजागृती पुरस्कार :- सीमा वाघमोडे (पुणे), डॉ. निरज जाधव (पुणे), निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार :- श्रीमती संध्या चौगुले (सातारा)