देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:30+5:302021-08-18T04:14:30+5:30
नारायणगाव : राष्ट्रीय कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहून आपले कर्तव्य समर्पित भावनेने बजावून भारत मातेची अविरतपणे सेवा करणाऱ्या सैनिकांचे कार्य ...
नारायणगाव : राष्ट्रीय कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहून आपले कर्तव्य समर्पित भावनेने बजावून भारत मातेची अविरतपणे सेवा करणाऱ्या सैनिकांचे कार्य निश्चितपणे उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे, असे विचार रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सैनिकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जुन्नर तालुक्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शरद शिंदे, अरविंद ब्रह्मेकाका, डॉ. हनुमंत भोसले, ज्ञानेश्वर लोखंडे, ब्रिजेश बांदिल, कमलाकांत मुंढे, तेजस वाजगे, प्रसाद बांगर, अनुपमा ब्रह्मे व रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी जुन्नर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष देविदास भुजबळ, उमेश अवचट, रमेश खरमाळे, सतीश भुजबळ, शिवाजी पाटे, एकनाथ वाजगे, सुधीर खेबडे, हरिश्चंद्र कोल्हे, दशरथ डोंगरे, राजेंद्र अडसरे, युवराज देवकर, बाळासाहेब मुळे, प्रवीण शेळके, चंद्रकांत मुळे, मंगेश वायकर, सुभाष काकडे, मोहन बनसोडे, भानुदास नायकोडी आदी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते अमित बेनके, देविदास भुजबळ, रमेश खरमाळे, उमेश अवचट, दशरथ डोंगरे, सुधीर खेबडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन योगेश भिडे, सचिन घोडेकर, रेखा ब्रह्मे, डॉ. केतकी काचळे, रिनाली वामन, सीमा महाजन, निर्मला मेहेर, मृदुला मेहेर यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत ब्रह्मे यांनी तर सूत्रसंचलन ट्रेझरर हेमंत महाजन यांनी केले. राजेंद्र बोरा यांनी आभार मानले.
फोटो ओळ - रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
170821\img-20210816-wa0214.jpg
रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सैनिकांचा सन्मान करण्यात आला.