बोअरवेल्सचे भाडेदर न वाढल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:09 AM2021-02-15T04:09:59+5:302021-02-15T04:09:59+5:30
दिवसेंदिवस डिझलचे दर वाढतच आहेत. त्यातच वाढलेले मजुरीदर, देखभाल खर्च यामुळे तालुक्यातील बोअरवेल मशिन मालकांना नुकसान सहन करावे लागत ...
दिवसेंदिवस डिझलचे दर वाढतच आहेत. त्यातच वाढलेले मजुरीदर, देखभाल खर्च यामुळे तालुक्यातील बोअरवेल मशिन मालकांना नुकसान सहन करावे लागत आहे.काही शहरांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये बोअरवेल मालकांना अपेक्षित दरवाढ मिळाली आहे. जुन्नर तालुक्यातही ही दरवाढ ऐंशी रुपये करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने दिनेश सहाणे, अनंत कदम, पप्पू चव्हाण, प्रकाश चव्हाण, सुभाष खिल्लारी, संदीप डावखर, मुरलीधर दुरगुडे, तान्हाजी गावडे, अजित सहाणे आदी सर्वानी
केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात मागील वर्षी मोठे आर्थिक नुकसान बोअरवेल गाड्यांना सहन करावे लागले आहे. त्यातच मजुरांचा खर्चही वाढलेला असून यामुळे शेतकरी वर्गाचेही नुकसान होऊ नये या दृष्टीने ही माफक अशी दरवाढ असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.
बोअरवेल चालक-मालक असोसिएशनच्या वतीने आळेफाटा (ता. जुन्नर) येथे काम बंद