आळंदीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:30+5:302021-09-09T04:14:30+5:30

सद्य:स्थितीत चिंबळी येथे पंचवीस मीटर व केळगावमध्ये पन्नास मीटर लांबीचे काम राहिलेले आहे. चिंबळी येथे पद्मावती मंदिर परिसरात सुरू ...

The work of water supply to Alandi is in the final stage | आळंदीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

आळंदीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

Next

सद्य:स्थितीत चिंबळी येथे पंचवीस मीटर व केळगावमध्ये पन्नास मीटर लांबीचे काम राहिलेले आहे. चिंबळी येथे पद्मावती मंदिर परिसरात सुरू असलेले काम स्थानिक शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या कामाची नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या तांत्रिक अडचणींचे निरसन करून संबंधित ठेकेदारांना काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता धनंजय जगधने, ठेकेदार विकी जावळे, मयूर गोरे, नवनाथ आंधळे, मयूर लोखंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कुरुळी जॅकवेल ते आळंदी पाणीपुरवठा केंद्रापर्यंत १५ एअर व्हॉल्व्हचे कामदेखील पूर्णत्वास आले आहे. येत्या सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत फ्लो मीटर व जलवाहिनीचे राहिलेले काम पूर्ण करून जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती अभियंता धनंजय जगधने व विकी जावळे यांनी दिली.

फोटो ओळ : आळंदीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी करताना पदाधिकारी. दुसऱ्या छायाचित्रात जलवाहिनेचे सुरू असलेले काम. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: The work of water supply to Alandi is in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.