दलित वस्तीतील कामे मार्गी लागणार
By admin | Published: March 19, 2016 02:41 AM2016-03-19T02:41:44+5:302016-03-19T02:41:44+5:30
जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथील रखडलेली विकासकामे आता मार्गी लागणार असून, यासाठी ३४ लाख ५३ हजारांच्या निधीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण
पुणे : जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथील रखडलेली विकासकामे आता मार्गी लागणार असून, यासाठी ३४ लाख ५३ हजारांच्या निधीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून ५८२ कामे करण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांमधील हा सर्वाधिक निधी या वस्त्यांना मिळणार असून, विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे. यातून समाजमंदिर, बांधकाम, बंदिस्त गटार, काँक्रिटीकरणाचा रस्ता, नळपाणी पुरवठा व शौचालये आदी कामे होणार आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत (२0१५-१६) ३५ कोटींचा निधी मंजूर आहे.
यातील ३४ कोटी ५३
लाखांच्या निधीला प्रशासकीय
मंजुरी मिळाली आहे. हा निधी लोकसंख्येच्या निकषानुसार वाटप होणार असून, यात सर्वाधिक निधी हवेली तालुक्याला ८ कोटी ३१ लाख ८७ हजारांचा मिळणार असून, त्या खालोखाल बारामती ४ कोटी ७७ लाख, ८९ हजार तर दौंड तालुक्याला ४ कोटी १४ लाख ५ हजार इतका निधी मिळणार आहे.
मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासकामांना यामुळे गती देण्याचा प्रयत्न केला असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)