‘पार्ट’ लोडिंग करताना विजेच्या तारांना स्पर्श, कामगाराचा मृत्यू; तळवडेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:32 PM2024-01-15T12:32:45+5:302024-01-15T12:34:21+5:30
तळवडे येथील अतुल इंडस्ट्रीज प्रिमायसेस येथे ४ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली....
पिंपरी : क्रेनला लावून जॉब पार्ट कंपनीच्या गोडाऊनमधून बाहेर घेत असताना वीजतारांना जाॅबचा स्पर्श झाला. त्यामुळे जॉब पकडलेल्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तळवडे येथील अतुल इंडस्ट्रीज प्रिमायसेस येथे ४ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली.
जीलाजित प्रेमबहादूर गौतम (२३) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. क्रेन चालक आलोक कुमार महतो (३३, रा. तळवडे, ता. हवेली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल इंडस्ट्रीजच्या प्रिमायसेसमध्ये हेमंत इंडस्ट्रीज येथे सात ते आठ टन वजनाचा चौकोनी आकाराचा ब्रॉयलर प्रेशर पार्ट स्टोरेज प्लेस गोडाऊनमधून बाहेर काढून गाडीमध्ये लोडिंग करण्यात येत होता. त्यावेळी असताना क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे पार्टचा विजेच्या तारांना धक्का लागला. तारांमधील वीजपुरवठा जॉबमध्ये उतरला. जीलाजित हा जॉब पार्ट धरून उभा असल्याने त्याला विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.