श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपाचा कळस उतरविताना कामगार पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 12:38 AM2017-09-04T00:38:08+5:302017-09-04T00:38:50+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार 40 फुटांवरुन खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी

The worker fell down after the exit of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Mandap | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपाचा कळस उतरविताना कामगार पडला

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपाचा कळस उतरविताना कामगार पडला

Next

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार 40 फुटांवरुन खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. 

राम जाधव (वय २३, रा. नांदेड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंडपाच्या बाहेरील भागाचा विसर्जन मिरवणुकीला अडथळा होणार असल्याने बाहेरील बाजुचा भाग हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मंदिराच्या कळसाचा भाग काढण्यासाठी जाधव वर चढला होता. 

त्याच्यासोबत आणखी दोन कामगारही वर होते. तो क्रेनची दोरी कळसाला बांधून खाली येत असतानाच क्रेन चालकाने शिखराचा भाग उचलला. जाधवच्या पायामध्ये दोरी अडकल्यामुळे तो खाली पडला. खाली पडताना देखावा आणि त्यानंतर खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर आपटून तो जमिनीवर पडला. थरकुडे क्रेन सर्व्हिस यांच्याकडे जाधव हा काम करतो. कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. जाधव याच्या डोक्याला व मणक्याला गंभीर मार लागला आहे. 

Web Title: The worker fell down after the exit of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.