महामेट्रो कार शेडमधील गोळीबारात एक कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:18+5:302021-08-27T04:16:18+5:30

पुणे : कोथरूड कचरा डेपो येथील हिल व्ह्यू कार शेडवर गोळीबार झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडल्या. या गोळीबारात ...

A worker was injured in a shooting at a Mahometro car shed | महामेट्रो कार शेडमधील गोळीबारात एक कामगार जखमी

महामेट्रो कार शेडमधील गोळीबारात एक कामगार जखमी

Next

पुणे : कोथरूड कचरा डेपो येथील हिल व्ह्यू कार शेडवर गोळीबार झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडल्या. या गोळीबारात तेथील कर्मचाऱ्याच्या छातीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे. या परिसरात डीआरडीओकडून सराव केला जात असताना हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्तविली आहे.

अंजयकुमार श्रीवास्तव (वय २४, रा. बिहार) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो कारशेडमध्ये दोन कर्मचारी बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वेल्डिंगचे काम करत होते. त्यावेळी एका कर्मचाऱ्याजवळून काही तरी गेल्याचा भास झाला. त्याने खाली उतरून पाहिल्यावर तेथे बंदुकीची पुंगळी पडल्याचे त्याला दिसले. त्यावेळी त्याला त्याच्या शर्टमधून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्याने ही माहिती तेथील सुपरवायझरला दिली. दरम्यान, त्या ठिकाणी आणखी तीन ते चार वेळा आवाज झाला. अंजयकुमार याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या छातीला चाटून गोळी गेल्याचे आढळून आले. सुपरवायझरने कोथरूड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांना तेथे एक बंदुकीच्या गोळीची पुंगळी मिळाली. त्यानंतर गुरुवारी सकाळी तेथे पाहणी केली असताना पोलिसांनी कारशेड परिसरात आणखी ३ पुंगळ्या आढळून आल्या. तेथे बंदुकीच्या गोळीच्या एकूण चार पुंगळ्या सापडल्या.

मेट्रोचा कारशेड हा कचरा डेपोच्या जागेवर उभारला आहे. त्याला लागूनच एक टेकडी असून, त्या टेकडीच्या दुसऱ्या बाजूला लष्करी आस्थापना आहेत. त्यामुळे या टेकडीवर अनेकदा लष्करी आस्थापनांकडून विविध प्रकारचा सराव केला जातो. दरम्यान, बुधवारी सायंकाळी गोळीबाराचा सराव सुरू असताना, हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र नेमका गोळीबार कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

.........

कोटमेट्रो कारशेड येथे गोळीबाराची घटना घडली. त्याबाबत मेट्रो कारशेडलगत असलेल्या लष्करी आस्थापनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

......

पहिली गोळी सापडल्यानंतर परिसरात आणखी त्या कर्मचाऱ्याला दोन गोळ्या पडल्याचे आढळले. त्यामुळे आम्ही तत्काळ पोलिसांत तक्रार दिली.

हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो, पुणे

Web Title: A worker was injured in a shooting at a Mahometro car shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.