Pune: विजेचे खांब उभे करण्यासाठी आलेल्या कामगाराचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 19:25 IST2023-09-25T19:23:53+5:302023-09-25T19:25:11+5:30
या कामगाराचा घोडनदीजवळील खार ओढापात्रात बुडून मृत्यू झाला...

Pune: विजेचे खांब उभे करण्यासाठी आलेल्या कामगाराचा बुडून मृत्यू
कवठे येमाई (पुणे) : कवठे येमाई परिसरात लाईटचे खांब उभे करण्यासाठी आलेल्या कामगार टोळीतील राजेंद्र विक्रम कोळी (वय २५ ) (रा. जळगाव) या कामगाराचा घोडनदीजवळील खार ओढापात्रात बुडून मृत्यू झाला.
खांब रोवण्याचे काम पावसामुळे बंद असलेने राजेंद्र कोळी मित्रांसोबत पोहण्यास गेला. परिसरामध्ये पाऊस झाल्याने ओढ्याला वाहते पाणी होते. राजेंद्र कोळी याचा खडकावरून पाय घसरल्याने तो पाण्याचे प्रवाहात वाहून गेला. माहिती मिळताच कवठे गाव कामगार तलाठी नायब तहसीलदार, पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या दिवशीही राजेंद्र कोळी याचा मृतदेह शोधण्यात अपयश आले.