वॅक्स म्युझिअममध्ये कामगारांनी केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:17 AM2019-04-02T02:17:13+5:302019-04-02T02:17:40+5:30

लोणावळा : आरोपींना राजस्थानातून अटक

Workers did theft in the Wax Museum | वॅक्स म्युझिअममध्ये कामगारांनी केली चोरी

वॅक्स म्युझिअममध्ये कामगारांनी केली चोरी

googlenewsNext

लोणावळा : येथील सुनील वॅक्स म्युझिअममधील चोरीप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझिअमच्या कॉफी शॉपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना या ठिकाणची माहिती होती.

म्युझिअमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मोतीराम छत्राराम ओटावत (वय २२), हरिराम मोतीराम चव्हाण (वय २०) व शंकर चौहान (वय २३, सर्व रा. दानवरली गाव, जिल्हा -पाली, राजस्थान) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी पहाटे तिन्ही आरोपींनी तोंडाला कपडा बांधत बंद दरवाजाच्या ग्रिलमधून आतमध्ये प्रवेश केला. कॅश काउंटरमधील दोन लाख रुपये रोख, दोन मॉनिटर व एक एलईडी टीव्ही चोरून थेट राजस्थानला पोबारा केला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवत त्यांना राजस्थान येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी जाळ्यात
घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, वैभव सुरवसे, सामिल प्रकाश, राम जगताप यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवत राजस्थान गाठले. त्या ठिकाणी तीनही आरोपींना एक लाख ४२ हजार रुपयांची रोकड व एक मॉनिटर याच्यासह ताब्यात घेतले.

Web Title: Workers did theft in the Wax Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.