त्या कामगाराचे ३७ दिवस उपोषण; तरीही न्याय मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:56 AM2018-03-08T02:56:45+5:302018-03-08T02:56:45+5:30

कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न्याय मिळण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सुरू केलेले

 That worker's fast for 37 days; Still do not get justice! | त्या कामगाराचे ३७ दिवस उपोषण; तरीही न्याय मिळेना!

त्या कामगाराचे ३७ दिवस उपोषण; तरीही न्याय मिळेना!

Next

महाळुंगे -  कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न्याय मिळण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सुरू केलेले आमरण उपोषण आज बुधवार ( दि.७ मार्च) ३७ व्या दिवशीही सुरूच आहे. न्याय मिळत नसल्याने सावळे हे आपल्या आमरण उपोषणावर ठाम राहिले असून, एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळेल, या प्रतीक्षेत आहेत.
उपोषणस्थळी कंपनीचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी अद्याप फिरकला नसून, सावळे हे दिवसभर उपोषणस्थळी नेमके काय करतात, त्यांना भेट देण्यासाठी कोण कोण येतात, यासाठी कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
सावळे यांनी हरियाना राज्यातील माने सर या गावात इंडूरन्स कंपनीत सलग दोन वर्षे काम केले आहे. त्यानंतर सावळे यांना चाकण येथील याच कंपनीत कामाला जाण्याचा आदेश देण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापनाचा आदेश ते चाकण येथे स्थायिक झाले.
या कंपनीत नोकरीवर असताना कंपनी व्यवस्थापनाने सावळे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. हरियाना येथील कारखान्याबाबत सावळे यांच्यावर अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
कंपनीचे आरोप फेटाळून लावत ते सिद्ध करून दाखवावेत, असे आवाहन सावळे यांनी केले आहे.
खातेनिहाय चौकशीचे कारण पुढे करत कंपनी व्यवस्थानाने सावळे यांना कामावरून निलंबित केले. कंपनीने ६ मे, २०१७ पासून सेवा कथीत बेकायदेशीरपणे कमी केल्याने सावळे यांच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यांनी
सोमवारपासून (दि. २९ जानेवारी) सुरू केलेले आमरण उपोषण आज बुधवारीही (दि.७ मार्च) म्हणजेच ३७ व्या दिवशीही सुरूच आहे.

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांचे स्वीय सहायकाने संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून सावळे यांच्या प्रकृतीची विचारणा केली. सावळे यांनी उपोषण सोडून कामगार आयुक्तांशी चर्चा करावी. यातून मार्ग निघण्यास विलंब होत असेल तर कामगार मंत्र्यासमोर या उपोषणाची दखल घेतली जाईल. चाकण भागात पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आले असता या कंपनीच्या काही पदाधिकाºयांनी सावळे यांचे उपोषण बेकादेशीर असून, त्यांना हटविण्यात यावे. असे सांगितले. मात्र, सावळे यांनी सांगितले की, कंपनीच्या लोकांनी नांगरे पाटील यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे.

उपोषण स्थळावर सीसीटीव्ही
आमरण उपोषणावर ठाम असलेल्या सावळे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असून, उपोषण कालावधीत उपोषण स्थळावरील त्यांचा काही समाजकंटकांनी मंडपही गायब केला. तर काहींनी फ्लेक्सची फाडतोड केली.
रात्रंदिवस सावळे उपोषणस्थळी नेमके काय करतात, याकरिता या कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरे उपोषण स्थळावर लावले आहेत. तरीही सावळे एक महिन्यासह आठ दिवस उलटून देखील उपोषण स्थळावरून हटले नाहीत.

Web Title:  That worker's fast for 37 days; Still do not get justice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.