एचए, फोर्स मोटर्सच्या कामगारांचे साकडे

By admin | Published: September 25, 2015 01:01 AM2015-09-25T01:01:04+5:302015-09-25T01:01:04+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) आणि आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीच्या कामगारांचे वेगवेगळे आंदोलन सुरू आहे.

The workers of the Ha, Force Motors | एचए, फोर्स मोटर्सच्या कामगारांचे साकडे

एचए, फोर्स मोटर्सच्या कामगारांचे साकडे

Next

पिंपरी : विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) आणि आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीच्या कामगारांचे वेगवेगळे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कामगारांनी गणरायाला साकडे घातले आहे. एचए कामगारांनी गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन केले नाही, तर फोर्स मोटर्सच्या चारपैकी दोन महिला अस्वस्थ असून, दोघींनी कामगारांच्या आग्रहाखातर उपोषण सोडले आहे. शहरात एकीकडे आनंदोत्सव, दुसरीकडे हक्कासाठी झगडणारा कामगार असा विरोधाभास जाणवत आहे.
एचए कंपनीच्या कामगार आणि व्यवस्थापनातर्फे कॉलनीत ६० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. कामगारांचे १३ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. तसेच, दोन वर्षांपासून कंपनी पुनवर्सनाचा प्रस्ताव पडून आहे. उत्पादन ठप्प आहे. पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करावे, आदी मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. सध्या ते स्थगित केले होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी कामगारांनी थेट गणरायाला साकडे घातले आहे. ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत गणेशाचे विसर्जन करणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. कामगार दर वर्षी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, अद्याप कोणतेही आश्वासन न मिळाल्याने गणेशाचे विसर्जन केले गेले नाही. याच ठिकाणी नवरात्रोत्सव (दुर्गोत्सव) साजरा केला जातो. त्या काळातही या प्रकारचे आंदोलन छेडले जाणार असल्याचे कामगारांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या प्रश्नी तोडगा निघावा, अशी विनवणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.
दुसरीकडे फोर्स मोटर्स कंपनीचे कामगार कुटुंबीयांतील ६ महिला १ तारखेपासून आमरण उपोषणास बसल्या आहेत. वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन सुरू आहे. कामगार मंत्री, पालकमंत्री, खासदार आदींनी आश्वासन देऊनही आंदोलन कायम आहे. मंगळवारी २२ व्या दिवशी प्रकृती बिघडल्याने रेखा जगताप व उषा काळे यांना अतिदक्षता विभागात दाखल केले.
डॉक्टरांनी त्याचे उपोषण सोडण्याची विनंती केली. कामगारांची आग्रही
विनंती लक्षात घेऊन उपोषण सोडले. मात्र, उर्वरित चौघांपैकी दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योग्य तोडगा निघून आंदोलन संपावे, अशी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गणरायाला साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The workers of the Ha, Force Motors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.