कामगारांनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:30+5:302021-03-17T04:11:30+5:30
: नोंदणीकृत कामगारांना ओळखपत्र व सुरक्षा किटचे साहित्य वाटप -- तळेगाव ढमढेरे : कामगारांसाठी सध्या बांधकाम कामगार योजनेच्या ...
: नोंदणीकृत कामगारांना ओळखपत्र व सुरक्षा किटचे साहित्य वाटप
--
तळेगाव ढमढेरे : कामगारांसाठी सध्या बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून चांगला लाभ मिळत त्या योजनेचा फायदा देखील कामगारांना होत आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले आहे.
शासनाच्या बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना नोंदणीनंतर तब्बल अठ्ठावीस प्रकारचे लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिक्रापूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून धानोरे, विठ्ठलवाडी, डिंग्रजवाडी, टाकळी भीमा, करंदी, पाबळ येथील २७८ कामगारांची नोंदणी झाली असून नोंदणी केलेल्या अनेक कामगारांना या योजनेच्या माध्यमातून सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी सांगितले.
बांधकाम कामगार महामंडळ योजनेबाबत २१ ते ५५ वर्षे वयोगटातील कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगार नोंदणी झाल्यानंतर प्रथम त्यांना ओळखपत्र देण्यात येत असून त्यांनतर काही दिवसात त्यांना सुरक्षा कीटचे वाटप, त्यांनतर नोंदणीकृत कामगारांना ३० भांडी तसेच विमा कवच, अपघात विमा, घर बांधणी, मुलांचे शिक्षण, महिलांना प्रसूतीसाठी अर्थ सहाय्य करणे यांसह आदी लाभ बांधकाम कामगारांना मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
फोटो क्रमांक : १६ तळेगाव ढमढेरे बांधकाम कामगार महामंडळ
फोटो ओळ : बांधकाम कामगारांना योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले सुरक्षा कीटचे वाटप
--