मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले कामगार ; अग्निशमन दलाने केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 21:19 IST2018-10-01T21:07:04+5:302018-10-01T21:19:22+5:30
कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांना सुखरुप बाहेर काढले.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले कामगार ; अग्निशमन दलाने केली सुटका
पुणे : कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांना सुखरुप बाहेर काढले.
गांधी लॉन्स जवळील नाल्यामध्ये साधारण बारा ते पंधरा फुट ड्रेनेज चे खोदकाम चालु अाहे. या खेड्यामध्ये दोन कामगार काम करत असताना अचानक मातीचा भराव खचला आणि सर्व माती दोन कामगारांच्या अंगावर पडली. दोघेही गळ्यापर्यंत गाडले गेल्याने इतरांनी आरडाओरडा केला. त्यांचा अारडाेअाेरडा एेकून जवळील देशप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष मंदार बलकवडे यांनी कार्यकर्त्यांसह मदतीसाठी पुढे आले.
अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कामगारांच्या बाजूची माती काढून सुरक्षितपणे दाेघांना बाहेर काढले. दोघांच्या पायाला मोठी जखम झाली असून जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. या वेळी अग्निशमन दलाचे सतीश जगताप राजेंद्र पायगुडे राजेंद्र भिलारे विठ्ठल सावंत आणि देशप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाचे कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवीतहानी टळली.