कुटुंबासह आत्मदहनाचा कामगारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:38 AM2019-03-17T00:38:19+5:302019-03-17T00:38:34+5:30

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ट्रॅन्टर इंडिया या कारखान्यातील १७ कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांचे १०० दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही सहा दिवस आमरण उपोषणास बसले असूनही कामगारांना न्याय मिळत नाही.

workers warning of suicide | कुटुंबासह आत्मदहनाचा कामगारांचा इशारा

कुटुंबासह आत्मदहनाचा कामगारांचा इशारा

googlenewsNext

कोरेगाव भीमा - डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ट्रॅन्टर इंडिया या कारखान्यातील १७ कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांचे १०० दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही सहा दिवस आमरण उपोषणास बसले असूनही कामगारांना न्याय मिळत नाही. दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास कुटुंबासह अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणास बसलेल्या कामगारांनी दिला.
या कारखान्यात १७ ते २२ वर्षांपासून काम करणाऱ्या १७ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता १ डिसेंबरपासून कामावरून काढल्यामुळे गेले १०० दिवस हे कामगार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण करीत असून कारखाना व्यवस्थापन कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने कामगारांच्या साखळी उपोषणास आता पत्नी-मुलांसह गेल्या काही दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ बसले होते. १०० दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही कारखाना व्यवस्थापनाने कोणताही तोडगा न काढल्याने १७ कामगार आमरण उपोषणाला बसलेले आहेत. यावेळी उपोषणास बसलेल्या कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले, की कारखान्यात गेली १७ ते २२ वर्षे काम करीत असताना २५० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे व अनेक सन्मानचिन्हे देत उत्कृष्ट कामगार पुरस्काराने कारखाना व्यवस्थापनाने गौरवूनही आम्हाला अचानक कारखान्यातून कोणतीही चूक नसताना काढण्यात आले आहे. कारखाना व्यवस्थापन १०६ दिवसांत आमच्याकडे फिरकलेसुद्धा नाही. उलट पोलिसांमार्फत दबाव आणले जात आहेत. आम्हाला लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणाही सहकार्य करीत नसल्याने आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलांसह सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी कामगारांनी देतानाच यास जबाबदार म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर गणेश गोपाल, व्हाईस प्रेसिडेंट शिरोज नांबियार, एचआर वेदप्रकाश तिवारी, लोकेश मंत्री यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, दत्तात्रय येळवंडे, रमेश सातपुते, अविनाश वाडेकर, गणेश जाधव, राजाराम शिंदे, नवनाथ यनभर, भाऊ रोकडे, नवनाथ गव्हाणे, राजू दरेकर आदी उपस्थित होते.
परिसरातील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येत व्यवस्थापनाच्या भूमिकेचा निषेध केला. दरम्यान, याबाबत कारखाना व्यवस्थापनाचे अधिकारी वेदप्रकाश तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: workers warning of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे