कल्याणमध्ये श्रमदानातून विकासकामे

By Admin | Published: May 30, 2017 02:00 AM2017-05-30T02:00:14+5:302017-05-30T02:00:14+5:30

कल्याण (ता. हवेली) येथे श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या वतीने जलसवंर्धनाच्या उद्दिष्टाने आयोजित उपक्रमात विविध

Workers' welfare work in Kalyan | कल्याणमध्ये श्रमदानातून विकासकामे

कल्याणमध्ये श्रमदानातून विकासकामे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : कल्याण (ता. हवेली) येथे श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या वतीने जलसवंर्धनाच्या उद्दिष्टाने आयोजित उपक्रमात विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली.
उपक्रमाचा शुभारंभ सरपंच कुंदाताई डिंबळे यांच्या हस्ते व माजी जि. प. सदस्य रमेश बापू कोंडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीराताई आरेकर, उपाध्यक्ष सोमनाथ डिंबळे, सचिव बाबासाहेब लगड व कल्याण गावाचे उपसरपंच अभिजित डिंबळे यांच्यासह ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंधाऱ्याचे काम हाती

या उपक्रमांतर्गत गावातील तीन बंधाऱ्याचे गाळ काढणे, जुन्या बंधाऱ्यांची डागडुजी, शिवगंगा नदीपात्राचे खोलीकरण, नवीन सिमेंटचा एक पक्का बंधारा व गावकुसाच्या हद्दीत नवीन दहा वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे .
या कामांकरिता श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनद्वारे कल्याण गाव पुढील पाच वर्षांकरिता दत्तक घेतले असून उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी कल्याण गावाच्या तरुण पिढीचा व महिलावर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे या वेळी फाऊंडेशनचे संतोष डिंबळे यांनी सांगितले.

Web Title: Workers' welfare work in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.