अध्यक्षा, उपाध्यक्षाविना चाकण महिला दक्षात कमिटीचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:39+5:302021-03-08T04:11:39+5:30
चाकण : पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत महिला दक्षता कमिटीची स्थापना होऊन दोन वर्षे झाली आहेत. पहिल्या वर्षात ...
चाकण : पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत महिला दक्षता कमिटीची स्थापना होऊन दोन वर्षे झाली आहेत. पहिल्या वर्षात जवळपास ८५ टक्के भांडण तंटे झालेल्या लोकांचे समुपदेशन करून ती मिटवण्यात दक्षता कमिटीने यश मिळवले आहे. त्यानंतर अध्यक्षा, उपाध्यक्षा नसतानाही या समितीचे काम उत्कृष्टपद्धतीने सुरु आहे. महिलांसाठी एक मुक्त समुपदेशक म्हणून काम या समितीचे काम सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुळे गतवर्षी समितीची बैठक झाली नसली तरी सदस्यांनी कामांमध्ये खंड पडू दिला नाही.
चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे नागरिकीकरण चांगलेच वाढले आहे.यामुळे भांडण, तंटा,घरगुती वादविवाद,महिलांच्या अडीअडचणी यांचे समोरासमोर कुटुंबातील नागरिक यांना बोलवुन त्यांचे समुपदेश करण्यात येते. तसेच नवरा-बायकोची भांडणे हे प्रमाण सुद्धा वाढले आहे.महिला व मुलींना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी महिलांना न्याय मिळावा यासाठी दक्षता कमिटी चाकण पोलीस ठाण्यात करण्यात आली.
कोरोनाच्या काळातही दक्षता समितीने चांगले काम केले आहे.सध्या दक्षता समितीवरील पदाधिकारी असलेल्या काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे.त्यामुळे समितीमधील महत्वाची पदे रिक्त आहेत. तरीही इतर सदस्यांनी कोरोनाच्या काळात महत्वाची कामे केली आहे.या समितीमध्ये रुपाली परदेशी,संध्या जाधव,विजया जाधव, झहीरा मुंडे, दीपाली भोई, कीर्ती गायकवाड, सविता धाडगे, रोहिणी गावडे, ज्योती वाघ, मंगल जाधव, शुभांगी पठारे यांच्यासह चाकण शहरातील व ग्रामीण भागातील माहिलांचा समावेश करण्यात आला आहे.
चाकण महिला दक्षता कमिटी ही खेड पोलीस स्टेशन अंतर्गत महिलांसाठी एक मुक्त समुपदेशक म्हणून काम करते.पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली तर दोन्ही पार्ट्यांमधे समन्वय घडविण्यासाठी चर्चा होते आणि चर्चेतून सामंजस्याचा मार्ग काढला जातो आणि मुख्य म्हणजे चर्चा होताना मुख्यतः महिला मनमोकळेपणे आपली बाजू मांडतात. पोलीस स्टेशन आणि तक्रारदार यामधील दुवा म्हणुन महिला दक्षता कमिटी आपले कार्य करते.