जिल्ह्यातील गुऱ्हाळ मालकांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:12+5:302021-09-25T04:10:12+5:30
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत काही गूळ उत्पादक चुकीच्या पद्धतीने गूळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत काही गूळ उत्पादक चुकीच्या पद्धतीने गूळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गूळ उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे गूळ उत्पादन कसे करावे याबाबत अन्न व औषध प्रशासनातर्फे २६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बालाजी मंगल कार्यालय, हांडाळवाडी, म्हसोबा चौक, केडगाव दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेत मार्क लॅब येथील डॉ. वसुधा केसकर व अन्न व औषध प्रशासनचे विधी अधिकारी संपतराव देशमुख हे अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ नियमने २०११ अंतर्गत व प्रचलित गूळ उत्पादनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली.