महोगनी वनशेतीबाबत कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:23+5:302021-09-10T04:14:23+5:30

महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. पुणे व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित केव्हीके बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने या तीनदिवशीय कार्यशाळेचे ...

Workshop on Mahogany Forestry at Krishi Vigyan Kendra | महोगनी वनशेतीबाबत कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यशाळा

महोगनी वनशेतीबाबत कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यशाळा

Next

महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. पुणे व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित केव्हीके बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने या तीनदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील ९० प्रतिनिधी हजर झाले आहेत. कंपनीचे संचालक गणेश हराळ यांनी प्रस्थाविकामध्ये महोगनी वृक्ष निचरा होणारी जमीन व दुष्काळ ग्रस्थ भागासाठी वरदान ठरत आहे. महोगनी वृक्ष पानाचा उपयोग डासरोधक उत्पादन बनविणे, फळामधील बियाचा उपयोग मधुमेह, कॅनसर, मलेरिया, अनेमिया, डायरिया यासारख्या आजारामध्ये वैद्यकीय कारणासाठी व औषधामध्ये केला जात आहे. याचे लाकूड लाल गडद लालसर गुलाबी रंगाचे उच्च घनता असलेले असते. लाकडचा उपयोग संगीत वाद्य, खेळणी ,घरातील फर्निचर व तसेच जहाज बांधणीसाठी केला जातो हे लाकूड १०० वर्षे दीर्घकालीन टिकते या लाकडाला बाजारामध्ये मागणी जास्त आहे, असे ते म्हणाले. कंपनीचे संस्थापक भगतशिंग शेळके म्हणाले की, महोगनी वृक्ष रोपणामुळे पर्यावरणाचा समतोल ठेवता येतो. त्या मुळे कार्बोन क्रेडिटचा लाभ घेता येतो. या झाडाची लागवड १० बाय १० फुटांवर केली जाते. प्रतिएकरी ४४४ रोपे लागतात. सदर लागवडीसाठी पंचायत समिती व सामाजिक वन विभाग अंतर्गत प्रतिएकर रुपये २ लाख ५१ हजार ७४८ अनुदानाचा लाभ तीन वर्षापर्यंत टप्प्या-टप्प्याने जॉबकार्डधारक शेतकऱ्यांना घेता येतो. पीकतज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी कीड व रोग व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन केले. हनुमंत शेंडगे यांनी माती परीक्षण व खत व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. तसेच विषयतज्ज्ञ संतोष गोडसे यांनी केव्हीकेची माहिती दिली व फार्मची शिवार फेरी घेतली.

फोटो ओळी : बारामती येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये महोगनी वनशेतीबाबत कार्यशाळा सुरू झाली आहे.

०९०९२०२१-बारामती-०९

Web Title: Workshop on Mahogany Forestry at Krishi Vigyan Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.