भोरला जागतिक बांबू दिवसानिमित्त कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:06+5:302021-09-22T04:11:06+5:30

जागतिक बांबू दिवस निमित्त भोर उपवन विभागाच्या वनपरिक्षेत्र भोर व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भोर वनपरिक्षेत्र ...

Workshop on the occasion of World Bamboo Day at dawn | भोरला जागतिक बांबू दिवसानिमित्त कार्यशाळा

भोरला जागतिक बांबू दिवसानिमित्त कार्यशाळा

googlenewsNext

जागतिक बांबू दिवस निमित्त भोर उपवन विभागाच्या वनपरिक्षेत्र भोर व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भोर वनपरिक्षेत्र कार्यालय आवारामध्ये भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकरी-यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेचे मुख्य प्रवक्ते डॉ. नचिकेत ठाकूर यांनी बांबू लागवड उत्पादन, मूल्यवर्धन,बांबूपासून वस्तू बनविणे यावर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम आशा भोंग उपविभागीय वनाधिकारी भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यशाळेसाठी जी. टी. चव्हाण,वृत्त समन्वयक बांबू विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, बारामती सदस्य, महाराष्ट्र बांबू उत्पादक व उद्योजक महासंघ सदस्य,बांबूमध्ये काम करणारे तज्ज्ञ, संघटक,शेतकरी असे मिळून ९० लोक उपस्थित होते.

सदर कार्यशाळेचे आयोजन दत्तात्रय मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी भोर व वनपरिक्षेत्र स्टाफ यांनी केले होते

Web Title: Workshop on the occasion of World Bamboo Day at dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.