‘यशस्वी’च्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी कामगिरी

By Admin | Published: June 21, 2015 12:37 AM2015-06-21T00:37:02+5:302015-06-21T00:37:02+5:30

बेळगाव येथील स्पर्धेत देशभरातील स्केटिंगपटूंनी १२१ तास सलग स्केटिंगचा विश्वविक्रम नोंदविला. त्यात चिंचवड येथील यशश्री स्केटिंग

World achievement performance of 'Success' students | ‘यशस्वी’च्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी कामगिरी

‘यशस्वी’च्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी कामगिरी

googlenewsNext

पिंपरी : बेळगाव येथील स्पर्धेत देशभरातील स्केटिंगपटूंनी १२१ तास सलग स्केटिंगचा विश्वविक्रम नोंदविला. त्यात चिंचवड येथील यशश्री स्केटिंग क्लबच्या पाच विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमात यशस्वी सहभाग नोंदविला.
शिवगंगा स्केटिंग क्लबने आयोजित स्पर्धेत ३० मे रोजी सायंकाळी सलग २४ तास स्केटिंगला सुरुवात करून आपलाच विक्रम स्पर्धकांनी मोडला. ३१ मे रोजी सलग ४८ तासांचा विक्रम पूर्ण करण्यात आला.
१ जून रोजी सायंकाळी स्केटर्सनी ७ हजार ९९७ लॅप्स पूर्ण करीत एक हजार ५६५ किलोमीटरचे अंतर कापत ७२ तास ४५ मिनिटांचा विक्रम नोंदविला. २ जून रोजी सकाळी सव्वादहा वाजता ११ हजार २२० लॅप्स पूर्ण करीत २२४० किमीचे अंतर कापत चीनमधील क्लबने नोंदविलेला विक्रम मोडला.
३ जून रोजी सायंकाळी सव्वासात वाजता जल्लोषात विश्वविक्रम पूर्ण करण्यात आला. १५ हजार ७५३ लॅप्स पूर्ण करीत ३५०० किलोमीटरचे अंतर कापत पथकाने लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडियन अ‍ॅचिव्हर्स बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले. विश्वविक्रमासाठी प्रथमेश गोरे, प्रसाद भोईर, आदित्य कुलकर्णी, पूर्वेश देशमुख, विविन प्रज्वल या स्केटर्सना प्रशिक्षक संदीप सोळंकी, मनोज ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
(वा. प्र.)

Web Title: World achievement performance of 'Success' students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.