World Brain Tumor Day | वेळ वाचवाल, तरच मेंदू वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 02:39 PM2022-06-08T14:39:05+5:302022-06-08T14:40:01+5:30

सौम्य ब्रेन ट्युमरमध्ये मेनिन्जिओमा, श्वानोमा एपेन्डीमोमा इत्यादींचा समावेश...

world Brain Tumor Day 2022 if you Save time it will save your brain | World Brain Tumor Day | वेळ वाचवाल, तरच मेंदू वाचेल

World Brain Tumor Day | वेळ वाचवाल, तरच मेंदू वाचेल

googlenewsNext

पुणे : ब्रेन ट्युमर म्हटले की ‘जगण्याची आशा संपली’, अशी आपल्याकडे धारणा तयार झालेली आहे. तसेच, प्रत्येक ट्युमर हा कॅन्सरच असतो, असे मानले जाते. मात्र, अनेकदा मेंदूतील ट्युमरची गाठ ही कॅन्सरची असेलच असे नाही. गाठ कॅन्सरची असेल किंवा नसेल, इतर आजारांप्रमाणेच लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास ब्रेन ट्युमर बरा होऊ शकतो. त्यामुळेच ‘वेळ वाचवाल, तर मेंदू वाचेल’ असा सल्ला न्यूरोलॉजिस्टनी ‘जागतिक ब्रेन ट्युमर दिना’निमित्त दिला आहे.

ब्रेन ट्युमरचे दोन प्रकार आहेत - सौम्य आणि घातक. सौम्य ब्रेन ट्युमरमध्ये मेनिन्जिओमा, श्वानोमा एपेन्डीमोमा इत्यादींचा समावेश होतो. या ट्युमरचे कोणतेही कारण नाही. त्यापैकी बहुतेकांना संपूर्ण शस्त्रक्रिया काढून टाकणे शक्य आहे आणि पुढील उपचारांची आवश्यकता नाही. इतर प्रकारचे ट्युमर घातक असतात, ज्यात ग्लिओमासचा समावेश होतो. हे मेंदूच्या उतींचे कर्करोग आहेत. अशा ट्युमरसाठी उपचार म्हणजे ट्युमर काढून टाकणे आणि त्यानंतर कर्करोगाच्या श्रेणीनुसार रेडिओथेरपी देणे. कमी दर्जाच्या कर्करोगाचे आयुर्मान चांगले असते.

लक्षणे :

डोकेदुखी, उलट्या, चालताना असंतुलन, हात किंवा पाय अर्धांगवायू, दृष्टी धूसर होणे, चक्कर येणे, मुलांमध्ये उलट्या होणे, डोक्याच्या आकारात असामान्य वाढ होणे, डोके वाजणे, दृष्टी अधू होणे, दृष्टीस पडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, रंग ओळखता न येणे, बोलताना अडखळणे, हाता-पायातील ताकद कमी होणे. २० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ब्रायन ट्युमरचे निदान सीटी आणि एमआरआय स्कॅनद्वारे केले जाऊ शकते.

बेनाईन ट्युमरची गाठ कॅन्सरची नसते. ९०-९५ टक्के रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून ट्युमर काढला जातो आणि तो पुन्हा येत नाही. काही वेळा ट्युमर खूप छोटा आणि मेंदूच्या आतील भागात असतो. अशा वेळी रेडिओ सर्जरीने पेशी मारल्या जातात आणि ट्युमरची वाढ खुंटते. बरेचदा, गुणसूत्रांमध्ये बदल झाल्यामुळे अथवा काही दोष असल्यास ब्रेन ट्युमर होऊ शकतो. मात्र, नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. मद्यपान, धूम्रपान, ताणतणाव अशा कारणांचाही आजार वाढण्यास हातभार लागतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. वेळेवर निदान आणि उपचार हाच त्यावरचा उपाय आहे. ब्रेन ट्युमरच झाल्याची भीतीच खच्चीकरण करते. त्यामुळे घाबरून न जाता रुग्णाने आणि नातेवाईकांनी सकारात्मक राहणे आवश्यक असते.

- डाॅ. मनीष सबनीस, न्यूरोसर्जन, सह्याद्री हॉस्पिटल

पूर्वी ५५-६० वर्षांपुढील व्यक्तींमध्ये ट्युमरचे निदान होत असे. आता अगदी तरुणांमध्ये, लहान मुलांमध्येही ब्रेन ट्युमर झाल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. देशात दरवर्षी साधारणपणे ३० हजार रुग्णांमध्ये ब्रेन ट्युमरचे निदान होते. काळानुरूप आजाराचे स्वरूपही बदलत आहे. इतर आजारांप्रमाणे लवकर निदान आणि वेळेत उपचाराने रोग बरा करू शकतात. सध्या जगभरात ग्लायब्लास्टोमा या हाय ग्रेड ट्युमरबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू आहे.

- डॉ. आनंद काटकर, न्यूरोसर्जन

Web Title: world Brain Tumor Day 2022 if you Save time it will save your brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.