क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:44 AM2019-01-01T01:44:17+5:302019-01-01T01:44:38+5:30

पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

World class players will be created from sports capital - Devendra Fadnavis | क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील - देवेंद्र फडणवीस

क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील - देवेंद्र फडणवीस

Next

पुणे : पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केलेले टेनिस बॉल रॅकेटने प्रेक्षकांच्या दिशेने टोलावले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, संजय उर्फ बाळा भेगडे, भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, एसएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर, राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल या वेळी उपस्थित होते. मुख्य स्पर्धेपूर्वी जगातील चौथ्या मानांकीत केरोलीना मेरिन, अभिनेत्री तापसी पन्नू, टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यात प्रदर्शनीय सामाना झाला.
फडणवीस म्हणाले, एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील नामांकीत खेळाडू या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे टेनिस प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. तसेच या निमित्त जगजेत्त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. त्यातून ते निश्चित प्रेरणा घेतील. अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि पुणे निश्चितच पुढाकार घेईल. भारताचा अव्वल खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरण आणि अमेरिकेच्या मायकेल मोह यांच्यात पहिला सामना झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मैदानात थांबून सामन्याचा आनंद लुटला.

Web Title: World class players will be created from sports capital - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.