बहुळ येथे जागतिक पर्यावरणदिनी वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:26+5:302021-06-06T04:08:26+5:30
यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बहूळ येथे खेड तालुका माहिती सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ...
यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बहूळ येथे खेड तालुका माहिती सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध वृक्षांची लागवड केली. याप्रसंगी खेड तालुका माहिती सेवा समितीचे अध्यक्ष गुलाब वाडेकर, विशाल वाडेकर, विनोद जाधव, भवाजी वाडेकर, गणेश वाडेकर आदिंसह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला संदेश देतोय. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे. आज ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो; मात्र कायमस्वरूपी फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना आपण विसरू नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे खेड तालुकाध्यक्ष गुलाब वाडेकर यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : ०५शेलपिंपळगाव पर्यावरण दिन
फोटो ओळ : बहुळ (ता. खेड) येथे वृक्षारोपण करताना माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते.