जगप्रसिध्द कुस्तीपटू खली जेव्हा " वाह वा " म्हणत करतो अडीच किलो नॉनव्हेज फस्त..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 07:26 PM2019-05-29T19:26:19+5:302019-05-29T19:27:18+5:30
महाराष्ट्रीयन जेवण महाराष्ट्रीय लोक यांच्याबद्दल खली ने आपुलकी व्यक्त केली.
पुणे : आपण ज्यांना कुस्तीच्या मैदानावर एकापेक्षा एक अशा बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना चितपट करताना पाहिले. त्या जगप्रसिद्ध कुस्तीपटू खली यांच्याबद्दल प्रत्यक्ष ते दिसतात कसे, बोलतात कसे, त्यांचा आहार काय यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करुन सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे.. दौंड तालुक्यातील चौफुला येथील हॉटेलमध्ये जेव्हा खली अवतरतो.. त्याला पाहून उपस्थितांना धक्काच बसतो..यावेळी खली रान या नॉनव्हेज पदार्थाचा वाहवा म्हणत मनपसंद आस्वाद घेतात.. आश्चर्य म्हणजे तब्बल एक ना दोन तर तब्बल अडीच किलो रान हा नॉनव्हेज पदार्थ फस्त करतात.
शिरूर येथील राष्ट्रवादी नेते मंगलदास बांदल यांच्या विनंतीला मान देऊन खली हे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता हॉटेलमध्ये हजर झाले. यावेळी सरासरी अडीच किलो वजनाचे दोन रान त्यांनी फस्त केले. एका रानचे वजन सव्वा किलो असते. रान हे मेंढीच्या पायापासून बनवलेले असते .पुणे जिल्ह्यामध्ये रान खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय खली यांनी बिर्याणीचा आस्वाद घेतला .महाराष्ट्रीयन जेवण महाराष्ट्रीय लोक यांच्याबद्दल त्यांनी आपुलकी व्यक्त केली. एक तासाच्या विश्रांतीनंतर खली हे प्रवासासाठी मार्गस्थ झाले.