एका वटवाघळाने टांगले जगाला; जागतिक आरोग्य संघटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:20 AM2020-03-30T00:20:34+5:302020-03-30T06:27:32+5:30

कोव्हिड विषाणू हा चार जात कुळींमध्ये विभागला जातो.

The world hangs by a barbarian; World Health Organization | एका वटवाघळाने टांगले जगाला; जागतिक आरोग्य संघटना

एका वटवाघळाने टांगले जगाला; जागतिक आरोग्य संघटना

googlenewsNext

- विशाल शिर्के 

पुणे : सध्या जगभर थैमान घालत असलेला कोरोना विषाणू आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडात आढळत असलेल्या व्हिनोलोफस जातीच्या वटवाघळातून संक्रमण झाल्याची दाट शक्यता जागतिकआरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) वर्तवली आहे. हॉर्सहो बॅट या नावाने हे वटवाघूळ प्रसिद्ध आहे. पाळीव अथवा जंगली प्राण्यांच्या माध्यमातून मानवात याचा संसर्ग झाला असल्याचे आत्तापर्यंतचा अभ्यास सांगत आहे.

कोव्हिड विषाणू हा चार जात कुळींमध्ये विभागला जातो. अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्डा. यातील अल्फा आणि बीटा या प्रकारामुळे मानवात आणि प्राण्यांमध्ये देखील आजार होऊ शकतो. सव्हीअर अक्युट रेस्पीरेटरी सिंड्रोम (सार्स) हा मांजरीचे पिल्लू आणि मानवामधे संक्रमित झाल्याचे आढळून आले होते.

मिडल ईस्ट रीस्पेरेटरी सिंड्रोम (मर्स) मर्सचा विषाणू सांडणी (मादी उंट) आणि मानवात लागण झाल्याचे आढळून आले होते. या दोन्ही वेळी प्राण्यांमधून मानवामध्ये विषाणूचे संक्रमण झाल्याचे आढळले होते. कोव्हिड-२०१९, सार्स आणि मर्स हे तिन्ही आजार कोरोना श्रेणीतील विषाणूंमुळेच झाले आहेत. कोणताही नवीन विषाणू जेव्हा आढळतो, तेव्हा त्याचा उगम माहिती असणे गरजेचे असते.

कारण त्यामुळे त्याची जनुकीय ओळख व्हायला मदत होते. तसेच, त्याचे जवळचे साधर्म्य कोणत्या विषाणूशी आहे, हे देखील चटकन ओळखता येते. त्यामुळे त्याची वाढ आणि प्रसाराची संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागालाही त्याची माहिती देता येते. त्यामुळे
त्याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याबरोबरच योग्य उपचार पद्धती ठरविण्यास त्याची मदत होते.

विषाणू पाळीव प्राण्यांमध्ये आढळत नाही

ºिहनोलफस या जातीचे वटवाघूळ आशिया, आफ्रिका, मध्यपूर्वेतील देश (मिडल ईस्ट कंट्री) आणि युरोपात आढळून येतो. पूर्वीचा सार्स देखील वटवाघळातूनच पाळीव प्राण्यांमध्ये आला होता. त्यानंतर त्याचा प्रसार मानवात झाला होता. कोराना श्रेणीतील विषाणू पाळीव प्राण्यांमध्ये आढळून येत नाहीत. त्यामुळे सध्यातरी याचा प्रसार वटवाघळातून पाळीव अथवा जंगली प्राण्यात झाला. त्यानंतर मानवात संक्रमण झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे.

Web Title: The world hangs by a barbarian; World Health Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.