World Heart Day : काळजी घ्या! हृदयराेगाचे प्रमाण 'या' वयोगटात ४१ टक्क्यांहून वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 03:58 PM2023-09-30T15:58:58+5:302023-09-30T15:59:18+5:30

होमोसिस्टीनचे वाढते प्रमाण हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक चिन्हांपैकी एक मानले जाते....

World Heart Day prevalence of heart disease increased by 41 percent in this age group | World Heart Day : काळजी घ्या! हृदयराेगाचे प्रमाण 'या' वयोगटात ४१ टक्क्यांहून वाढले

World Heart Day : काळजी घ्या! हृदयराेगाचे प्रमाण 'या' वयोगटात ४१ टक्क्यांहून वाढले

googlenewsNext

पुणे : पुण्यातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या (सीव्हीडी) घटनांचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण बनले आहे. यावर्षी शहराच्या लोकसंख्येवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, २५ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये ४१ टक्क्यांहून अधिक जणांच्या रक्तप्रवाहात होमोसिस्टीनची उच्च पातळी दिसून आली. होमोसिस्टीनचे वाढते प्रमाण हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक चिन्हांपैकी एक मानले जाते.

हृदयांच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयराेग दिन साजरा केला जाताे. उपचार करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे प्रमाण रुग्णाचे वय जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी होऊ लागले आहे. इंडियन हार्ट असोसिएशननुसार, इतर लोकसंख्याशास्त्राच्या तुलनेत जवळजवळ ते ३३ टक्केपर्यंत कमी झाले आहे. या नवीन संशाेधनानुसार एकट्या महाराष्ट्रात, सीव्हीडीमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण एका वर्षात प्रति हजार लोकसंख्येमागे अंदाजे १.५४ मृत्यू इतके आहे.

याबाबत इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ. राजेंद्र पाटील, म्हणाले, “हृदयविकाराचा धोका निर्माण करणारे प्राथमिक जोखीम घटक म्हणजे जीवनशैलीविषयक विकार आहेत. त्यात उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यांचा समावेश होतो. धूम्रपानासारख्या अस्वास्थ्यकर सवयी, अति प्रमाणात मद्यपान, बैठी जीवनशैली आणि जंक फूडने भरलेला आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते. याशिवाय, व्यस्त जीवनशैली, जन्मजात विकार किंवा हृदयविकाराचा आनुवंशिक इतिहास यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.”

याकडे दुर्लक्ष करू नका

छातीत दुखणे या गोष्टीकडे अनेकदा आम्लपित्त किंवा अपचन म्हणून दुर्लक्ष केले जाते; परंतु, हे हृदयविकाराच्या सर्वाधिक सर्वसाधारण इशारा देणाऱ्या लक्षणांपैकी एक आहे. त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. छातीत जडपणा येणे, जडपणा जाणवणे, धडधडणे, वरच्या बाजूला कळ येणे, घाम येणे, धाप लागणे, ढेकर येणे, डोके हलके होणे, छातीत जळजळ होणे आणि हृदयाचे ठोके जलद होणे, यांसारखी लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत. लवकर निदान करणे महत्त्वाचे आहे. कारण लवकर निदान झाल्यास यशस्वी उपचार करता येऊ शकतात.

Web Title: World Heart Day prevalence of heart disease increased by 41 percent in this age group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.