संग्रहालय दिनीच मानवशास्त्र संग्रहालयास कुलूप : सगळे सुटटीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 08:59 AM2019-05-18T08:59:59+5:302019-05-18T09:00:02+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागतील आदिवासी जमातींच्या दुर्मिळ व प्राचीन वस्तूंचे प्रसिध्द इरावती कर्वे संग्रहालय जागतिक संग्रहालय दिनीच कुलूपबंद राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागतील आदिवासी जमातींच्या दुर्मिळ व प्राचीन वस्तूंचे प्रसिध्द इरावती कर्वे संग्रहालय जागतिक संग्रहालय दिनीच कुलूपबंद राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. विद्यापीठाला शनिवारी बुध्द पौर्णिमेची सुटटी असल्याने संग्रहालयही बंद राहणार असल्याचे संतापजनक उत्तर विभागाकडून देण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मानवशास्त्र विभागाची स्थापना १९७७ मध्ये झाली. मात्र त्यापूर्वीपासून विद्यापीठात मानवशास्त्र विषयाचा अभ्यास व संशोधन केले जाते. मानवशास्त्र शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी विद्यापीठात १९६३ ते १९७० या कालावधीत मानवशास्त्र विषयाचे अध्यापन केले. त्यांच्या पुढाकारातूच मानवशास्त्र अभ्यासाला गती आली.
विभागातील संशोधन, विद्यार्थी सातत्याने देशभरातील जंगलांमध्ये राहणाºया विविध आदिवासी पाडयांना भेटी देऊन वेगवेगळया जमातींचा अभ्यास करीत होते. त्यावेळी त्यांनी आदिवासींकडून अनेक प्राचीन वस्तू, पेटिंग्ज, पुरातन शिल्पे, पेंटिंग्स, पारंपरिक वस्त्रे, दागिने, भांडी, वाद्ये, खेळणी, नर्मदा खोºयातील हत्यारे तसेच पुरातन काळातील मानवी सांगडे यांचे संकलन केले. अभ्यासक, विद्यार्थी व लोकांसाठी या वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी १९९३ मध्ये त्यांचे संग्रहालय मानवशास्त्र विभागात सुरू करण्यात आले. यामध्ये देशातील ४५ पेक्षा अधिक आदिवासी जमातींनी १०९६ पुरातन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. देशभरातून मानवशास्त्राचे अनेक अभ्यासक आवर्जुन या संग्रहालयास भेटी देतात.नागरिकांसाठी २८ फेब्रुवारी व इतर विशेष दिवशी हे संग्रहालय खुले करण्यात येते. शनिवारी जागतिक संग्रहालय दिवस असल्याने हे संग्रहालय नागरिकांसाठी खुला ठेवला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र नेमकी या दिवशी सुटटी आल्याने हा प्रस्ताव काही वर्षे पडून होता. मात्र, कालांतराने विभागाने पाठपुरावा केल्यानंतर संग्रहालयाची देखभाल, सुरक्षा आणि इतर कारणास्तव संग्रहालयाला जागा देता येणार नसल्याचे उत्तर दिले. विद्यापीठ प्रशासनाची संग्रहालय उभारण्यासाठी जागा देण्याबाबत एकीकडे ही भूमिका सध्या विभागात ३० विद्यार्थी पदव्युत्तर पदवी तर २६ विद्यार्थी पीएचडी आणि एमफिलचे शिक्षण घेत आहेत.