जागतिक संग्रहालय दिन : ही आहेत पुण्यातील प्रसिद्ध बारा वस्तू संग्रहालये !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 08:13 AM2019-05-18T08:13:59+5:302019-05-18T08:15:02+5:30
आज जागतिक संग्रहालय दिवस. तेव्हा शनिवार, मुलांची सुट्टी आणि संग्रहालय असा तिहेरी क्षण न चुकवता शहरातील संग्रहालयाला नक्की भेट द्या. पण ते संग्रहालय कोणते हवे यासाठी आम्ही देत आहोत तब्बल बारा पर्याय.
पुणे : आज जागतिक संग्रहालय दिवस. तेव्हा शनिवार, मुलांची सुट्टी आणि संग्रहालय असा तिहेरी क्षण न चुकवता शहरातील संग्रहालयाला नक्की भेट द्या. पण ते संग्रहालय कोणते हवे यासाठी आम्ही देत आहोत तब्बल बारा पर्याय. तेव्हा पुण्यातल्या या वस्तू संग्रहालयांना भेट देऊन जुने वैभव आणि सुवर्ण क्षण अनुभवायला विसरू नका.
१. राजा दिनकर केळकर संग्रहालय
पत्ता :- १३७७/७८ कमलकुंज, बाजीराव रस्ता, नातू बाग, शुक्रवार पेठ.
वेळ :- सकाळी १० ते सायंकाळी ५.३०
प्रवेश फी :- ५० रुपये
२. आगाखान पॅलेस
पत्ता :- गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान, बंडगार्डन, येरवडा.
वेळ :- सकाळी ९ ते सायंकाळी ५.३०.
३. महात्मा फुले संग्रहालय
पत्ता :- १२०४/१० घोले रस्ता, शिवाजीनगर.
वेळ :- सकाळी ९ ते सायंकाळी ५
४. जोशी लघु रेल्वे संग्रहायल
पत्ता :- १७/१, बी २, कुलकर्णी पथ, संगमप्रेसजवळ, कोथरूड.
वेळ :- सोमवार ते शुक्रवार
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५
शनिवार
सकाळी ९.३० ते दुपारी ४
सायंकाळी ५ ते ८
रविवार
सायंकाळी ५ ते ८
५. ब्लेड ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय
पत्ता :- गोविंद गौरव अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनी, पर्वती पायथा.
वेळ :- सकाळी १० ते ७
प्रवेश फी :- १०० रुपये
६. डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय मेमोरियल
पत्ता :- सेनापती बापट रस्ता, पासपोर्ट आॅफिससमोर, हनुमान नगर, वडारवाडी.
वेळ :- सकाळी ९ ते सायंकाळी ५.३०
७. लोकमान्य टिळक संग्रहालय
पत्ता :- ५२५/३ नारायण पेठ, केसरीवाडा.
वेळ :- सकाळी ९.३० ते दुपारी १
आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५
८. मराठा इतिहास संग्रहालय
पत्ता :- डेक्कन कॉलेज रस्ता, येरवडा.
वेळ :- सोमवार ते शनिवार
सकाळी १०.३० ते दुपारी १.३०
दुपारी २.३० ते ४.३०
रविवार बंद
प्रवेश फी :- शालेय विद्यार्थी १० रुपये, महाविद्यालयीन विद्यार्थी २० रुपये, सामान्य नागरिक ३० रुपये, परदेशी नागरिक ५० रुपये, छायाचित्रकार १०० रुपये (एक कॅमेरा), व्हिडीओग्राफर ५०० रुपये ( एक व्हिडिओ )
९. विक्रम पेंडसे सायकल संग्रहालय
पत्ता :- २२ हर्ष बंगलो, लेन नंबर ६, सहवास सोसायटी, कर्वेनगर.
वेळ :- सकाळी ११ ते सायंकाळी ७
मंगळवारी बंद
प्रवेश फी १०० रुपये
१०. पेशवे संग्रहालय
पत्ता :- पर्वती
वेळ :- सकाळी ७.३० ते सायंकाळी ८
प्रवेश फी १५ रुपये
११. महर्षी कर्वे संग्रहालय
पत्ता :- ११/९ए/१, वारजे माळवाडी रस्ता, हिंगणे बुद्रुक, कर्वे नगर.
वेळ :- सकाळी १० ते दुपारी ४
रविवार बंद
१२. पुरातत्व संग्रहालय डेक्कन कॉलेज
पत्ता :- डेक्कन कॉलेज येरवडा
वेळ :- सोमवार ते शुक्रवार
सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०