पुण्यात नोव्हेंबरमध्ये रंगणार विश्व पंजाबी साहित्य संमेलन
By admin | Published: October 13, 2016 04:55 AM2016-10-13T04:55:53+5:302016-10-13T04:55:53+5:30
गुरू गोविंदसिंगजी यांच्या ३५0 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १८, १९ व २0 नोव्हेंबर रोजी विश्व पंजाबी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
गुरू गोविंदसिंगजी यांच्या ३५0 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १८, १९ व २0 नोव्हेंबर रोजी विश्व पंजाबी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनात भारताच्या विविध राज्यातील तसेच कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलियासह विविध देशातले पंजाबी लेखक, साहित्यिक, कवी, समीक्षक व पंजाबी साहित्यप्रेमी बांधव सहभागी होणार आहेत. पंजाब सरकार, महाराष्ट्र सरकार व पुणे महापालिकेच्या सहकार्याने संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी पुणे येथील सरहद संस्थेने स्वीकारली आहे. संमेलनासाठी पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राचे गुरू गोविंदसिंग नगरी असे नामकरण करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या पूर्वतयारीची कल्पना देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत निमंत्रक संस्था सरहद चे प्रमुख संजय नहार म्हणाले, गत वर्षी संत नामदेवांची कर्मभूमी पंजाबमधील घुमान येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलन भरले होते. विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात भरवण्याची घोषणा या संमेलनातच झाली. पुणे येथील विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान विख्यात पंजाबी साहित्यिक पद्मश्री डॉ. सुरजीत पातर भूषवणार आहेत.
संमेलनाच्या स्वागत समितीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पंजाब केसरीचे विजयकुमार चोप्रा, पत्रकार कुलदीप नय्यर, पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, संतसिंग मोखा, आरपीएस सहगल आदी सन्माननीय मान्यवरांसह घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे पदाधिकारी व पंजाबी साहित्यप्रेमी हितचिंतकांचा समावेश आहे.’ पंजाबी साहित्य संमेलनासाठी ँ३३स्र://५्र२ँ६ंस्र४ल्ल्नुं्र२ंँ्र३२ेंी’ंल्ल.ूङ्मे अशी वेबसाइट सुरू करण्यात आली असून ई मेल संपर्काचा पत्ता ५्र२ँ६ंस्र४ल्ल्नुं्र२ंँ्र३२ेंी’ंल्ल@ॅें्र’.ूङ्मेअसा आहे.