जागतिक चिमणी दिवसानिमित्त ‘चिमण्याचे घरकुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:33+5:302021-03-19T04:10:33+5:30

पुणे : दररोज सकाळी आपल्या मधूर चिवचिवाटाने आपल्याला जागे करणारी सर्वांची लाडकी ‘चिऊताई’! मात्र, त्या चिमण्यांची संख्या ...

World Sparrow Day | जागतिक चिमणी दिवसानिमित्त ‘चिमण्याचे घरकुल’

जागतिक चिमणी दिवसानिमित्त ‘चिमण्याचे घरकुल’

Next

पुणे : दररोज सकाळी आपल्या मधूर चिवचिवाटाने आपल्याला जागे करणारी सर्वांची लाडकी ‘चिऊताई’! मात्र, त्या चिमण्यांची संख्या दिवसागणिक रोडावते आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन लोकमत, पुणे व लोकमान्यनगरचे प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे ॲड. आनंद माहूरकर आणि संस्थापक ड्रीमवर्कस रिअल्टीचे उमेश पवार ह्यांनी एकत्र येऊन 'चिमण्यांचे घरकुल' असा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे.

चिमण्यांचा अधिवास वाढिवणे व त्यांची संख्या वाढवणे असे ह्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे ह्या विषयी सामाजिक प्रबोधन करण्यासंबंधी अनेक उपक्रम येत्या पाच वर्षात राबविले जाणार आहेत.

या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध ठिकाणाी चिमण्यांसाठी घरटी व फीडर्स लावण्यात येणार आहे. त्याव्दारे पर्यावरणाचे संतुलन राखायला हातभार लावला जाणार आहे.

२६ जानेवारी २०२१ पासून या प्रकल्पांतर्गत कार्य सुरू झाले. समाजातील विविध स्तरातील प्रभावशाली व्यक्तीस चिमण्यांची घरटी व फीडर्स देऊन प्रकल्पात सामिवष्ट केले जात आहे.

सामान्य लोकांनी सुद्धा ह्या प्रकल्पात सहभाग घेऊन अत्यंत चांगला प्रतिसाद दिलाय. पुढील टप्प्यात घरोघोरी पोहचून ह्या प्रकल्पाबद्दल माहिती देणे व अत्यंत माफक दारात चिमण्यांची घरटी आणि फीडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ ह्यांनी ह्या प्रकल्पाचे कौतुके केले आहे.

----------------

- प्रबोधन हा ह्या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच ‘जागतिक स्पॅरो डे’ निमित्त २० मार्च २०२१ रोजी प्रख्यात पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे संध्याकाळी ६. वाजता हा विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

- हा कार्यक्रम रजिस्ट्रेशनसाठी खालील दिलेल्या लिंकवर तसेच क्यूआर कोडवरुन देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. https://zoom.us/meeting/register/tJElfuqtrz4rEt3DBMZHPIdkbVt1_EzYMAMa झूम व फेसबुक वर सर्वांना बघता येतील. सर्वसामान्यांनी या प्रकल्पासोबतक लाडक्या चिऊताईला अधिवास देण्यास मदत करण्याचे आवाहन ह्या प्रकल्पाचे शिल्पकार अ‍ॅड. आनंद माहूरकर व उमेश पवार ह्यांनी केले आहे.

Web Title: World Sparrow Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.