जगातील पहिल्या खगोलशास्त्रविषयक इ-लर्निंग पोर्टलचे शनिवारी होणार उदघाटन        

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:57 PM2018-11-21T20:57:20+5:302018-11-21T20:58:39+5:30

खगोलशास्त्रातील विविध समस्या, शंका, कुतुहल शमविण्याचे काम करण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिल्या खगोलशास्त्र विषयक खास पोर्टलची निर्मिती करण्यात आले आहे.

The world's first astronomical e-learning portal will be inaugurated on Saturday | जगातील पहिल्या खगोलशास्त्रविषयक इ-लर्निंग पोर्टलचे शनिवारी होणार उदघाटन        

जगातील पहिल्या खगोलशास्त्रविषयक इ-लर्निंग पोर्टलचे शनिवारी होणार उदघाटन        

googlenewsNext

पुणे :   बालपणापासूनच खगोलविषयीचे आकर्षण असूनही त्याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहवयास मिळते.  खगोलशास्त्रातील विविध समस्या, शंका, कुतुहल शमविण्याचे काम करण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिल्या खगोलशास्त्र विषयक खास पोर्टलची निर्मिती करण्यात आले आहे. त्यामध्ये खगोलासंबंधी विविध पैलूंवर छोटेमोठे आॅडिओ - व्हिज्युअल  कोर्सेस तयार करण्यात येत आहेत. अशा  खगोलशिक्षणाच्या पोर्टलचे उदघाटन शनिवारी (24) रोजी होणार आहे.  'अ‍ॅस्ट्रॉन ' तर्फे यापूर्वी तयार केलेल्या आॅडिओ - व्हिज्युअल कोर्सेसना जगातल्या ७९ देशातल्या हजारो खगोलप्रेमींनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे विशेष पोर्टल बनवण्याची प्रेरणा मिळाल्याचे अ‍ॅस्ट्रॉन ' च्या संचालिका श्वेता कुलकर्णी यांनी सांगितले.   

                        पोर्टलचा शुभारंभ ’’एज आॅफ स्ट्रोन’’ या कार्यक्रमामध्ये, पुणे विद्यापीठातील  आयुकाच्या चंद्रशेखर आॅडिटोरियम येथे  २४ नोव्हेंबर  रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर,  डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. गोविंद  स्वरूप आदी मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत.  तसेच 'विज्ञान आणि सृजनशीलता' या आगळ्यावेगळ्या विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणा-या परिसंवादात डॉ. प्रमोद काळे निवृत्त प्रमुख ( इसरो), वंदना सक्सेना (इंटरनॅशनल अ‍ॅडवायझर ), मनीषा वर्मा ( आय ए एस ), डॉ. शाळीग्राम ( डीन  विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, विद्यापीठ ) डॉ. सुरेश नाईक  ( इस्त्रो ) यांचा सहभाग असणार आहे.   युवा अभिनेता शुभंकर एकबोटे 'आईनस्टाईन ' या एकपात्री प्रयोग सादर करणार आहे. जोडीला कुसुमाग्रजांच्या ' पृथ्वीचे प्रेमगीत' चे कवितावाचन वीणा  केळकर करणार  आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या गोडी बरोबरच खगोलशास्त्रांतील नवनवीन कल्पनांविषयीची माहिती विद्यार्थी व अभ्यासकांना व्हावी याकरिता अस्ट्रॉन संस्थेच्यावतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नवनवीन सर्जनशील विचारांना चालना मिळावी याकरिता  ‘‘आईनस्टाईन’’ या नाटकाचा प्रयोग विज्ञानप्रेमींकरिता आगळी पर्वणी ठरणार आहे.   

       ' अ‍ॅस्ट्रॉन ' तर्फे केवळ खगोलशिक्षणाला वाहिलेले असे हे पहिलेच पोर्टल सुरु करण्यामागची भूमिका विशद करताना कुलकर्णी म्हणाल्या, आकाश आणि ग्रह ता-यांबद्दल कुतूहल सगळ्यांनाच असते . मानवजातीला आरंभापासूनच पडलेले विश्वाबद्दलचे अजूनही न सुटलेले कोडे प्रत्येकालाच मनात अंशरूपाने अस्तित्वात असते. प्रकाशप्रदूषणापासून दूर कुठेतरी झालेले लखलखत्या आकाशगंगेचे आणि चमचमत्या ता-यांचे दर्शन आयुष्यभर आठवणीत राहून गेलेले असते. हे विश्व काय आहे ? याची सुरुवात कुठे आणि कशी ? परग्रहावर कोणी सजीव खरेच असतील का?  बालपणापासून पडलेले या विश्वाबद्दलचे प्रश्न आपण दुर्लक्षित करतो.  असे श्वेता कुलकर्णी यांनी सांगितले.  

Web Title: The world's first astronomical e-learning portal will be inaugurated on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.