‘त्यांच्या’ संगोपनाची आजोबांना चिंता

By admin | Published: January 11, 2016 01:38 AM2016-01-11T01:38:38+5:302016-01-11T01:38:38+5:30

जन्मदात्या आई—वडिलांच्या लैंगिक छळाने उद्ध्वस्त झालेल्या चिमुरड्यांच्या संगोपनासाठी थकलेल्या वयोवृद्ध आजी-आजोबांनी सामाजिक संस्थांना साकडे घातले आहे

Worried about the rivalry of 'their' companions | ‘त्यांच्या’ संगोपनाची आजोबांना चिंता

‘त्यांच्या’ संगोपनाची आजोबांना चिंता

Next

पारवडी : जन्मदात्या आई—वडिलांच्या लैंगिक छळाने उद्ध्वस्त झालेल्या चिमुरड्यांच्या संगोपनासाठी थकलेल्या वयोवृद्ध आजी-आजोबांनी सामाजिक संस्थांना साकडे घातले आहे. याच आजोबांनी पोलिसांची मदत घेऊन आई-वडिलांच्या लैंगिक छळातून मुलांची मुक्तता केली आहे. सध्या या निर्दयी आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस क ोठडीत तपास सुरू आहे.
पारवडी येथील ७८ वर्षीय आजोबा निवृत्त शिक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी आजोबांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने आपल्या मुलगा व सुनेच्या अमानुष अत्याचारातून तीन नातवंडांचे प्राण वाचविले आहेत. मुलांच्या अंगावर गरम पाणी ओतणे, त्यांना उपाशी ठेवणे, त्यांच्यासमोर अश्लील चाळे करून त्यांना तसे करण्यास भाग पाडणे, मुलांसमोर अश्लील कृत्य करण्याबाबत याच आजोबांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी या आई-वडिलांना अटक केल्यानंतर मुलांची या छळातून सुटका झाली. मात्र, आता या आजी-आजोबांना अजाणत्या वयातील मुलांच्या वाट्याला आलेला प्रसंग अस्वस्थ करीत आहे. या मुलांच्या संगोपनाची काळजी दोघांना लागली आहे. त्यामुळे त्यांनी सामाजिक संस्थांना मुलांच्या संगोपनासाठी साकडे घातले आहे.
आपल्या मुलाला व सुनेला कायद्यानुसार केलेल्या अपराधाची जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशीदेखील त्यांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Worried about the rivalry of 'their' companions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.