शेतक-यांना चिंता दराची
By admin | Published: October 8, 2014 05:42 AM2014-10-08T05:42:59+5:302014-10-08T05:42:59+5:30
उंडवडी सुपे (ता. बारामती) आणि परिसरात कांदा लागणीची लगबग सुरू झाली आहे. शिरसाई कालव्याचे पाणी सुटल्याने कांदा लागवडीस वेग आला आहे.
उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) आणि परिसरात कांदा लागणीची लगबग सुरू झाली आहे. शिरसाई कालव्याचे पाणी सुटल्याने कांदा लागवडीस वेग आला आहे.
जिरायती भागातील कांदा हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक समजले जाते; परंतु शासनाने कांद्याचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे कांदा जेव्हा बाजारात येईल, तेव्हा त्याला योग्य भाव मिळेल का? या चिंतेत जिरायती भागातील शेतकरी सध्या आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत कांदा लागणीचे दर वाढले असल्याचे शेतकरी सांगत आहे. सध्या कांदा रोपांचा एक वाफा साधारणत: ३ हजार रुपये व एकरी कांदा लागणीचा खर्च ४ हजार रुपये इतका चढ्या दराने शेतकरी कांदा लागण करीत आहे. पावसाच्या आशेवर शेतकरी कांदा लागवड करीत आहेत.
खरीप हंगाम वाया गेल्याने कांद्यामुळे तरी हातात पैसा येईल, या आशेवर शेतकरी आहेत. असे येथील कांदा उत्पादक मधुकर गवळी यांनी सांगितले. (वार्ताहर)