सासवडची पाण्याची चिंता मिटली

By admin | Published: July 27, 2014 12:19 AM2014-07-27T00:19:16+5:302014-07-27T00:19:16+5:30

पुणो व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणा:या वीर जलाशयात शनिवारी (दि. 26 जुलै) सुमारे 42 टक्के पाणीसाठा झाला

The worry of water in Sasvad came to an end | सासवडची पाण्याची चिंता मिटली

सासवडची पाण्याची चिंता मिटली

Next
सासवड : पुणो व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणा:या वीर जलाशयात शनिवारी (दि. 26 जुलै) सुमारे 42 टक्के पाणीसाठा झाला असून, सासवड शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. असे असले तरी सध्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
वेल्हा तालुक्यातील गुंजवणी धरण भरून पाणी नीरा नदीतून वीर धरणात आल्यामुळे वीरचा पाणीसाठा वाढला आहे. वीर धरणाची क्षमता 1क् टीएमसी असून, सध्या येथे 4 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. काल दुपारपासून धरणाचे डावा व उजवा हे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत.  सासवड नगरपालिकेला वीर योजनेतूनच सध्या पाणी पुरवठा होत आहे. पाणीसाठा वाढला तरी पाणी गढूळ असल्यामुळे सध्यातरी दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. वीर धरणाला सासवडचे उपनगराध्यक्ष अजित जगताप, नगरसेवक सुहास लांडगे, योगेश गिरमे, पाणी पुरवठा प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे यांनी भेट दिली. 
या वेळी अजित जगताप यांनी सांगितले की, पाणीटंचाई काळात नगर परिषदेने योग्य नियोजन करून शहराला पाणीपुरवठा केला. वीजपुरवठय़ाची समस्या दूर करण्यासाठी एक्स्प्रेस फिडरचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांबळवाडी व सासवड येथील वाघ डोंगर येथे पाणी साठवण तलाव बांधण्यात येणार आहेत.  (वार्ताहर)

 

Web Title: The worry of water in Sasvad came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.