भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:02 AM2021-07-13T04:02:08+5:302021-07-13T04:02:08+5:30
मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे, संचालक देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब ...
मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे, संचालक देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, तानाजी जंबूकर, ज्ञानेश्वर अस्वारे, रमेश कानडे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, स्टोअर किपर अनिल बोंबले, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कर्मचारी हजर होते.
अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सन २०२१-२२ गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये १० लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्यातील मशिनरी ओव्हरहॉलिंग, रिपेअरिंग कामे सुरु असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात हंगाम सुरु करण्याचे नियोजन केले आहे. कारखान्याची गाळपक्षमता ६००० मे.टन प्रतिदिन केली असल्याने सर्व उसाचे वेळेत गाळप होईल. चालू गाळप हंगाम मोठा असल्याने ऊस उत्पादक सभासदांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळितास द्यावा. तसेच ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, अधिकारी व कर्मचारी यांनी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बेंडे यांनी केले आहे.
फोटो ओळी :- मिल रोलरचे पूजन करताना कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व संचालक मंडळ.