पुनर्जिवित पिंपळवृक्षाच्या वर्षपूर्तीनिमित्त पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:44+5:302021-03-15T04:09:44+5:30

धनकवडी शेवटचा बसथांबा परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारे सुमारे २५ वर्षे जुने पिंपळाचे एक झाड होते. विकास कामात अडथळा ठरणारे ...

Worship on the occasion of the anniversary of the revived Pimpal tree | पुनर्जिवित पिंपळवृक्षाच्या वर्षपूर्तीनिमित्त पूजन

पुनर्जिवित पिंपळवृक्षाच्या वर्षपूर्तीनिमित्त पूजन

Next

धनकवडी शेवटचा बसथांबा परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारे सुमारे २५ वर्षे जुने पिंपळाचे एक झाड होते. विकास कामात अडथळा ठरणारे झाड काढणे आवश्यक होते. मात्र पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन नगरसेविका वर्षा तापकीर यांनी मागील वर्षी १३ मार्च २०२० रोजी हे झाड तेथून काढून कात्रज येथील राजीव गांधी उद्यान या ठिकणी पुनर्रोपण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. एक वर्षानंतर हे झाड नवीन ठिकाणी उत्तम प्रकारे रुजले. या पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडाच्या वर्षपूर्तीनिमित्त, झाडाचे पूजन नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

यावेळी उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता अजय वायसे, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, उद्यान निरीक्षक कडूबा निकाळजे, माजी नगरसेविका मोहिनी देवकर, गणेश शिंदे, विक्रांत तापकीर, राहुल ढमढेरे, कानिफनाथ शिंदे, अक्षय गायकवाड, श्रीकांत पाटील तसेच उद्यानातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

-----------------

फोटो ओळ - पुनर्जिवित पिंपळवृक्षाचे वर्षपूर्ती निमित्ताने पूजन करताना नगरसेविका वर्षा तापकीर, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव व इतर मान्यवर.

Web Title: Worship on the occasion of the anniversary of the revived Pimpal tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.