आळे येथील मंदिरात पूजा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:03+5:302021-07-21T04:10:03+5:30

आषाढी एकादशी निमित्त कोरोनाचे नियम पाळत वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिरात पहाटे महाभिषेक संजय पाटील कुऱ्हाडे महादेव ...

Worship in the temple at Ale | आळे येथील मंदिरात पूजा उत्साहात

आळे येथील मंदिरात पूजा उत्साहात

Next

आषाढी एकादशी निमित्त कोरोनाचे नियम पाळत वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिरात पहाटे महाभिषेक संजय पाटील कुऱ्हाडे महादेव टकले निलेश भुजबळ यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर सकाळी आमदार अतुल बेनके यांचे हस्ते शासकीय महापुजा झाली यावेळी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, गटविकास अधिकारी माळी, देवस्थान अध्यक्ष चारूदत्त साबळे, उपाध्यक्षपदी अविनाश कुऱ्हाडे व सचिव संतोष पाडेकर, खजिनदार संजय खंडागळे, आळे सरपंच प्रितम काळे, उपसरपंच विजय कऱ्हाडे, संतवाडी सरपंच नवनाथ, निम कोळवाडी सरपंच शैला गाढवे, उपसरपंच उपसरपंच दिनेश सहाणे, विश्वस्त धनंजय काळे, विलास शिरतर उपस्थित होते.

'ब' वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या मंदिर परिसरातील विकास कामांची पाहणी यावेळी आमदार अतुल बेनके यांनी केली. जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी वीणा मंडप बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३५ लक्ष रूपये मंजुर केले असताना आमदार अतुल बेनके यांनीही ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे अश्वासन यावेळी उपस्थित देवस्थान संस्थान विश्वस्त व पदाधिकारी यांना दिले.

--

फोटो क्रमांक : २० आळेफाटा आषाढी एकादशी

फोटो ओळी : श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी स्थळ मंदिरात शासकीय महापूजा करताना आमदार अतूल बेनके.

200721\20pun_3_20072021_6.jpg

फोटो क्रमांक : २० आळेफाटा आषाढी एकादशी फोटो ओळी : श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी स्थळ मंदिरात शासकीय महापूजा करताना आमदार अतूल बेनके.

Web Title: Worship in the temple at Ale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.