माहूर जलाशयातील पाण्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:31+5:302021-07-30T04:10:31+5:30

पुरंदर किल्ल्याच्या परिसरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या काही दिवसांपासून केदार गंगा नदीमधून माहूर जलाशयात पाणी येत आहे. ...

Worship of water in Mahur reservoir | माहूर जलाशयातील पाण्याचे पूजन

माहूर जलाशयातील पाण्याचे पूजन

Next

पुरंदर किल्ल्याच्या परिसरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या काही दिवसांपासून केदार गंगा नदीमधून माहूर जलाशयात पाणी येत आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वात आधी भरणारा जलाशय म्हणून माहूर जलाशयाची ओळख आहे. केदार गंगा नदीवर लघु पाटबंधारे विभागाचा माहूर जलाशय हा माहूर परिसरातील जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो. एक हजार क्षेत्राला या जलाशयातून बारमाही बागायत शेती केली असून तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचा वापर करून परिसरातील शेती बारमाही ओलीताखाली आणण्यात आली आहे.

माहूर जलाशय हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी हस्तांतरित केला असून या प्रकल्पाची देखभाल व पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहूर जाई पाणीवापर संस्था कार्यरत आहे.

यावेळी सत्यवान गोळे, राजेंद्र जगताप, परशुराम जगताप, तुकाराम जगताप, संतोष पांडे, संतोष गुरव, पंढरीनाथ जगताप, प्रशांत माहूरकर, बाळू जगताप, शंकर पवार, दत्तात्रय गोळे, हनुमंत माहूरकर, माजी उपसरपंच अमोल गोळे उपस्थित होते.

२९ परिंचे

जलपुजन करताना हेमंतकुमार माहूरकर, रामदास जगताप, शरद जगताप व शेतकरी.

Web Title: Worship of water in Mahur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.