आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरांना मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:24 PM2019-04-03T23:24:49+5:302019-04-03T23:25:02+5:30

वाघळवाडी (ता. बारामती) येथील आगीत शेळी आणि कोंबड्या मरण पावल्या, तर घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही, कपाट, घरातील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आदी चार कुटुंबांचे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Wreath to the houses of firefighters | आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरांना मदतीचा ओघ

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरांना मदतीचा ओघ

Next

सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील काल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चार घरांना परिसरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विविध प्रकारच्या मदतीतून आज माणुसकीचे दर्शन पाहावयास मिळाले.

वाघळवाडी (ता. बारामती) येथील आगीत शेळी आणि कोंबड्या मरण पावल्या, तर घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही, कपाट, घरातील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आदी चार कुटुंबांचे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कल्पना शहाजी खांडेकर, प्रमिला दऱ्याप्पा गोडसे, जमुनाबाई परशुराम घाडगे आणि शालन अशोक कोकरे अशी झोपड्या जळालेल्या कुटुंबीयांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करीत मदत केली होती.
आज सकाळी सोमेश्वरनगर येथील अक्षय शिंदे फाउंडेशनच्यावतीने या चारही कुटुंबांना फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, तसेच सचिव संजय शिंदे यांच्यावतीने प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सदस्य संतोष
शेंडकर, महेश जगताप, योगेश यादव, राजेंद्र बालगुडे, बाबूलाल पडवळ, तसेच शहाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या पैशांचा वापर घरे उभारणीसाठीच करावा, असे आवाहन आर. एन. शिंदे यांनी केले. त्याचबरोबर मुलांच्या शालेय साहित्याची भारत ज्ञान विज्ञान संघटनेने कालच तातडीने सोय केली, तसेच कोणी जुनी कपडे, कोणी ब्लँकेट, कोणी धान्य, तर कोणी वस्तूच्या स्वरुपात मदत केली.

गॅस कंपनी देणार मदत
४काल सिलिंडरचा स्फोट होऊन वाघळवाडी येथील चार घरे भस्मसात झाली होती. या सर्व कुटुंबांना गॅस कंपनीच्यावतीने मदत दिली जाणार असल्याची माहिती लोणंद येथील कुमार गॅस एजन्सीचे कार्यकारी संचालक अमित तापडिया यांनी दिली.

Web Title: Wreath to the houses of firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे