लेखिका शकुंतला फडणीस यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:36+5:302021-04-18T04:10:36+5:30

पुणे : प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यकार‌ शकुंतला फडणीस (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. प्रख्यात व्यंगचित्रकार शि. ...

Writer Shakuntala Fadnis passes away | लेखिका शकुंतला फडणीस यांचे निधन

लेखिका शकुंतला फडणीस यांचे निधन

Next

पुणे : प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यकार‌ शकुंतला फडणीस (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या त्या पत्नी होत. फडणीस यांच्या मागे पती शि. द. फडणीस तसेच दोन कन्या, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. भूकंप अभ्यासक अरुण बापट हे शकुंतला यांचे धाकटे बंधू आहेत.

शकुंतला फडणीस यांची कथा, ललित गद्य, संपादन, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमधील तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक वर्षे बालकुमारांसाठी लेखन करून त्यांनी बालसाहित्याला वेगळा आयाम दिला. मुलांसाठी दर्जेदार विनोदी कथा लिहिल्या. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात होणाऱ्या त्यांच्या कथाकथन कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असे. अखिल भारतीय मराठी बालकुमार संमेलन या संस्थेच्या पहिल्या शंभर सदस्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. संस्थेला सुरुवातीच्या काळात त्यांनी आर्थिक मदत केली. मुलांसाठीची पुस्तके बागेत आणि रस्त्यावर विकण्याच्या संस्थेच्या उपक्रम त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या त्या आधारवड होत्या.

शि. द. फडणीस यांच्या सर्व उपक्रमात शकुंतला यांनी मोलाची साथ दिली. शकुंतला फडणीस यांच्या साहित्याला राज्य सरकारच्या उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारासह तीन पुरस्कार तसेच पुणे महापालिकेचे आणि इतर अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. बापट कुल मंडळ, यशवंत वेणू पुरस्कार, मालतीबाई दांडेकर पुरस्कार व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या.

-------

Web Title: Writer Shakuntala Fadnis passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.