चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना : रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 09:37 PM2019-03-12T21:37:09+5:302019-03-12T21:40:40+5:30
रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते.
पुणे : फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसत आहे. फलाट तिकीटाची वेळ संपल्याचे कारण देत त्यांच्याकडून २५० रुपयांचा दंड आकारला जात आहे. गाडीला विलंब होणे ही प्रवाशांची चुक नाही. तरीही दोन तासाची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम आहे. या नियमाचा भुर्दंड सध्या अनेकांना सोसावा लागत आहे.
रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. या तिकीटाची मुदत दोन तासांची असते. ही मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घ्यावे, असा नियम आहे. दररोज हजारो फलाट तिकीटांची विक्री होते. त्यातून रेल्वेला मोठा महसुल मिळतो. पण, फलाट तिकीट काढणाºया अनेकांना वेगळ््याच समस्येचा सामना करावा लागत आहे.
मंगळवारी एका तरूणालाही याचा फटका बसला. तो फलाट तिकीट काढून महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट पाहत थांबला होता. पण गाडी विलंबाने आली. त्यातच तिकीटाची वेळ निघून गेल्याने तिकीट तपासणीसाने त्याला पकडले. त्याच्याकडून त्यावेळी फलाटावर उभ्या असलेल्या लोणावळा लोकलचे कमीत कमी भाडे २० रुपये व दंडाची २५० असा एकुण २७० रुपये दंड घेतला. याबाबत त्याने टिष्ट्वटरद्वारे रेल्वे मंत्रालय पुणे विभागाकडे ह्यगाडी विलंबाने आली, याचा माझा दोष कसाह्ण नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी तिकीटाची मुदत संपल्याने नियमानुसार नवीन तिकीट घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाडी विलंबाने आल्याचा फटका प्रवाशांना सोसावा लागत असला तरी रेल्वेकडून नियमावर बोट ठेवले जात आहे.
----------
रेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. तसेच न केल्यास त्यावेळी संबंधित फलाटावर उभ्या असलेल्या गाडीचे कमीत कमी तिकीट व २५० रुपये दंड अशा एकुण रकमेची दंडात्मक कारवाई केली जाते. संबंधित तिकीट धारक नेमक्या कोणत्या गाडीसाठी आला आहे, हे ओळखणे शक्य नाही. त्यामुळे एखादी गाडी विलंबाने आली तरी संबंधितांना नवीन तिकीट घेणे गरजेचे आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी
पुणे विभाग, मध्य रेल्वे
----------