येलभर, काशिद ‘महाराष्ट्र केसरी’साठी पात्र
By admin | Published: November 24, 2014 11:38 PM2014-11-24T23:38:59+5:302014-11-24T23:38:59+5:30
पुणो जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शिरूरच्या सचिन येलभर याने गादी, तर शिरूरच्याच गणोश काशिदने माती विभागात महाराष्ट्रकेसरी गटात अजिंक्यपद पटकावले.
Next
पौड : पुणो जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शिरूरच्या सचिन येलभर याने गादी, तर शिरूरच्याच गणोश काशिदने माती विभागात महाराष्ट्रकेसरी गटात अजिंक्यपद पटकावले. हे दोघेही अहमदनगर येथे होणा:या 58व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्रकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणो जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी इंदापूरच्या मल्लांनी वर्चस्व गाजविले तरी अखेरच्या सत्नात बाजी मारली ती शिरूरच्या सचिन येलभर व गणोश काशिदने. मुळशीच्या मल्लांची कुमार व गादी गटातील कुस्तीत चमक दाखवून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व पुणो जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने भूगाव ग्रामस्थांतर्फे पुणो जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
गेल्या दोन दिवस सुरु असलेल्या जिल्हा निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी आलेले जिल्हाभरातील मल्ल व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सोबत आलेले कुस्तीशौकीन प्रेक्षक यामुळे अवघी भूगावनगरी कुस्तीमय झाली होती. स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन माजी उपमुख्यमंत्नी अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पुणो जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, जिल्हा परिषदेचे गटनेते शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. शिवाजी तांगडे, शांताराम इंगवले, भूगावचे माजी उपसरपंच राहुूल शेडगे, अनिल पवार, अजित इंगवले, स्वस्तिक चोंधे, शांताराम करंजावणो आदी उपस्थित होते. याप्रसंगी ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेचे परदेशातून वृत्तांकन केल्याबद्दल क्रीडालेखक संजय दुधाणो यांना आदर्श क्रीडा पत्नकार पुरस्काराने माजी उपमुख्यमंत्नी अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हिंदकेसरी दीनानाथ सिंह, गणपतराव आंदळकर, माजी खासदार विदुरा नवले, अशोकराव मोहोळ, कैलास चोंधे, संदीप इंगवले, रमेश सणस, कुलदीप शेडगे, अमोल भिलारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
जिल्हा निवड चाचणी स्पर्धा यशस्वी केल्याने पुढील वर्षी महाराष्ट्रकेसरी स्पर्धा भरविण्याची तयारी भूगाव ग्रामस्थांनी दर्शविली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने हिरवा कंदील दर्शविला असून, लवकरच याची घोषणा करण्यात येईल, असे परिषदेचे माजी कार्याध्यक्ष नाना नवले यांनी जाहीर केले आहे.
कुमार विभाग-
42 किलो: 1) इकलास शेख (भोर), 2) संकेत ठाकूर (मावळ)
46 किलो : 1) आबा शेंडगे (शिरूर), 2) अक्षय कामथे (पुरंदर),
5क् किलो : 1) सागर भेगडे (मुळशी), 2) सौरभ कोकरे (इंदापूर),
54 किलो : 1) आनंद इंगवले (मुळशी), 2) अजय वाबळे (हवेली),
58 किलो : 1) अनिल कचरे (इंदापूर), 2) सौरभ शिंदे (शिरूर),
63 किलो : 1) स्वप्निल शिंदे (भोर), 2) भानुदास घारे (मावळ),
69 किलो: 1) शुभम गव्हाणो (शिरूर), 2) अक्षय लिंबोरे (पुरंदर),
76 किलो : 1) शिवराज राक्षे (खेड), 2) गणोश मोरे (हवेली),
76 ते 1क्क् किलो : 1) विक्रम पारखी (मुळशी), 2) बबन मलगुंडे (शिरूर)
वरिष्ठ माती विभाग :
57 किलो : 1) सागर मारकड (इंदापूर),
2) मोहन थोरवे (पुरंदर),
61 किलो : 1) सूरज कोकाटे,
2) सुमित खोपडे (भोर),
65 किलो : 1)दिनेश मोकाशी (बारामती),
2) सागर भोंग (इंदापूर),
7क् किलो : 1) बाबासाहेब डोंबाळे (इंदापूर),
2) नागेश राक्षे (मावळ),
74 किलो : 1) सद्दाम जमादार (इंदापूर),
2) बजरंग मारणो (मुळशी),
86 किलो : 1) सोनबा काळे (हवेली),
2) विकास येनपुरे (मावळ),
97 किलो : 1) भारत मदने (बारामती),
2) भूषण शिवतरे (भोर),
येलभरची काशिदवर
4जिल्हा निवड चाचणीतील सर्व महाराष्ट्रकेसरीच्या स्पर्धा संपल्यानंतर गादी व माती गटातील विजेत्यांची प्रेक्षणीय लढत कुस्तीशौकांनाना पाहण्यास मिळाली. 2क् मिनिटांच्या निकाली कुस्तीत 2 लाखांचे इनाम असताना शिरूरच्या या दोन्ही मल्लांनी निराशा केली. वेळ संपल्यानंतर ऑलिम्पिक नियमानुसार गुणांची कुस्तीत चुरस रंगली. गादी गटासाठी निवड झालेल्या सचिन येलभरने 4-3 गुणांनी कुस्ती जिंकत स्पर्धेचा शेवट कुस्तीमय केला.
वरिष्ठ गादी विभाग :-
51 किलो: 1) स्वप्निल शेलार (बारामती), 2) सागर शिंदे (हवेली),
61 किलो : 1) उत्कर्ष काळे (बारामती), 2) अशोक बंडगर (इंदपूर),
65 किलो : 1) सागर लोखंडे (खेड), 2) स्वप्निल दोन्हे (दौंड),
7क् किलो : 1) रवींद्र क:हे (इंदापूर), 2) प्रशांत आंग्रे (मुळशी),
74 किलो : 1) अनिकेत खोपडे (भोर), 2) प्रवीण राजिवडे (मावळ),
86 किलो: 1) सागर मोहोळ (मुळशी). 2) जयदीप बेंद्रे (शिरूर),
97 किलो: 1) राहुल खानेकर (मुळशी), 2) अविनाश गवारे (शिरूर),