खराडीत यमराज अवतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:33+5:302021-04-29T04:08:33+5:30

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात खराडी आणि परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. परिसरातील रुग्णलयांत उपचारासाठी बेड ...

Yamaraj incarnated in Kharadi | खराडीत यमराज अवतरले

खराडीत यमराज अवतरले

Next

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात खराडी आणि परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. परिसरातील रुग्णलयांत उपचारासाठी बेड मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीतदेखील नागरिक काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावर नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी साक्षात यमराजांचा वेष परिधान करून जनजागृती केली.

खराडी, चंदननगर भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यावर उपाय म्हणून अनेकवेळा कारवाईदेखील केली जात आहे. तसेच कोरोनाच्या संकटाची माहिती अधिक प्रकर्षाने व्हावी, यासाठी पथनाट्यातून जनजागृती करण्याची वेळ आली आहे, असे भैयासाहेब जाधव यांनी सांगितले. रायमराजांच्या सोबत चित्रगुप्ताच्या वेशात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण खैरे यांनी जनजागृती केली. युवक उपाध्यक्ष सुहास तळेकर, सागर धाराशिवकर यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नियम पाळले नाहीत तर नक्कीच यमसदनी जाण्याची तयारीच सुरू आहे. नाट्यातून जनजागृती करून नागरिकांना सावधान केले जात आहे. काही नागरिक लॉकडाऊन असतानादेखील परिसरात फिरताना आढळतात. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, विनाकारण घराबाहेर फिरणे, सॅनिटायझरचा वापर अशा अनेक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. खुळेवाडी भागात कामगार मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, त्या भागात जनजागृती करण्यात आली, असे जाधव म्हणाले. तसेच या पथनाट्यातून राजकीय फटकेबाजीदेखील करण्यात येत आहे.

चौकट

१७ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीतील आकडेवारीनुसार

*नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या भागातील रुग्णसंख्या

-सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील रुग्ण एकूण संख्या - ४६५४

* गृहविलगीकरणात उपचार घेत असलेले रुग्ण - ३२९०

-कोविड सेंटरमध्ये असलेले रुग्ण - १९१

-सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील रुग्ण एकूण- ४४५

* कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ७२८

Web Title: Yamaraj incarnated in Kharadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.