पुण्याचे यशराज दळवी, लालित्या रेड्डी अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:35 AM2018-05-08T03:35:37+5:302018-05-08T03:35:37+5:30
सोलारिस क्लबतर्फे आयोजित १६ वर्षांखालील अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धेत पुण्याच्या यशराज दळवी आणि लालित्या रेड्डी यांनी मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद प्राप्त केले.
पुणे - सोलारिस क्लबतर्फे आयोजित १६ वर्षांखालील अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धेत पुण्याच्या यशराज दळवी आणि लालित्या रेड्डी यांनी मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद प्राप्त केले.
कोथरूडमधील सोलारिस क्लबमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये 15 वर्षीय यशराज दळवी याने अग्रमानांकित प्रथम भुजबळ याचा ६-२, ६-१ असा सहज पराभव केला. एमआयटी शाळेमध्ये दहावी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या यशराजने प्रथम याचा ५0 मिनिटांच्या सामन्यांमध्ये सहज पराभव केला. पहिल्या सेटमध्ये यशराजने २, ४, ६ आणि आठव्या गेममध्ये प्रथमची सर्व्हिस बे्रक केली व हा सेट ६-२ असा सहज जिंकला.
दुसºया सेटमध्येही यशराजने आपले वर्चस्व कायम ठेवत दुसºया आणि सहाव्या फ्रेममध्ये प्रथमची सर्व्हिस बे्रक करून ६-१ असा सेट जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यशराजने वडील संतोष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचे धडे गिरवले आहेत. त्याचे या १६ वर्षे वयोगटातील हे सलग दुसरे विजेतेपद आहे.
मुलींच्या गटामध्ये लालित्या रेड्डी या अग्रमानांकित खेळाडूने दुसºया मानांकित आणि पुण्याच्या आर्या पाटील हिचा ६-३, ६-३ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ९0 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लालित्याने उत्तम खेळ करून आर्यावर वर्चस्व गाजवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारिसचे सीईओ हृषीकेश भानुशाली, रावेतकर ग्रुपच्या रूपा दांतले, स्पर्धा संचालक रविंद्र पांड्ये यांच्या हस्ते झाले.
निकाल : अंतिम फेरी : मुले : यशराज दवळी वि.वि. प्रथम भुजबळ ६-२, ६-१. उपांत्य फेरी : यशराज दळवी वि.वि. आयुष हिंडलेकर ९-२. प्रथम भुजबळ वि.वि. ओज डाबस ९-४.
अंतिम फेरी : मुली : लालित्या रेड्डी वि.वि. आर्या पाटील ६-३, ६-३. उपांत्य फेरी : लालित्या रेड्डी वि.वि. रिया भोसले ९-७; आर्या पाटील वि.वि. लोलाक्षी कांकरिया ९-४.