देऊळगावगाडा गावाची यात्रा साधे पद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:13+5:302021-04-07T04:10:13+5:30
खोर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब व तुकाईमाता यांची यात्रा सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. रविवारी ...
खोर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब व तुकाईमाता यांची यात्रा सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
रविवारी दि.४ रोजी श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेचा महाभिषेक त्यानंतर अष्टमी निमित्ताने सायंकाळी ५ वाजता लग्नसोहळा कार्यक्रम पार पाडून संध्याकाळी श्रींचा छबिना व हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांचा संदल कार्यक्रम मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला गेला. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या चौकटीत राहून नियमांचे पालन करून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली. बुधवार रोजी सकाळी पीरसाहेब यांचा जोरदचा कार्यक्रम अगदी मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला जाणार आहे. तर दुसरीकडे देऊळगावगाडा येथील देखील हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांची यात्रा सध्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम राबवून कुठल्याही प्रकारचे तमाशा, कुस्त्यांचे आखाडा हे कार्यक्रम न घेता शासनाच्या नियमांचे पालन करून यात्रा उत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असल्याची माहिती सरपंच विशाल बारवकर यांनी दिली आहे. यावेळी दोन्ही गावात दुकाने न थाटल्याने गावात शुकशुकाट पाहावयास मिळाला.
खोर (ता. दौंड) येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर सजविण्यात आलेले हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांचा दरबार.