निमगाव व खरपडी येथील खंडोबा देवाची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:33+5:302021-04-26T04:09:33+5:30

चैत्र पैर्णिमेनिमित्त मंगळवारी दि. २७ रोजी खंडोबा देवाची यात्रा आहे. दर वर्षी लाखो भाविक खंडोबा देवाच्या यात्रेसाठी व दर्शनासाठी ...

Yatra of Khandoba Deva at Nimgaon and Kharpadi canceled | निमगाव व खरपडी येथील खंडोबा देवाची यात्रा रद्द

निमगाव व खरपडी येथील खंडोबा देवाची यात्रा रद्द

Next

चैत्र पैर्णिमेनिमित्त मंगळवारी दि. २७ रोजी खंडोबा देवाची यात्रा आहे. दर वर्षी लाखो भाविक खंडोबा देवाच्या यात्रेसाठी व दर्शनासाठी येत असतात. यंदा मात्र कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या अटीचे पालन करुन मंदिरे बंद करण्यात आली असून यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, तसेच नवसाचे बैलगाडे घाटात पळविण्यास आणू नये. त्याचप्रमाणे जागरण गोंधळ हे कार्यक्रमही होणार नाही. दर वर्षी चैत्र पोर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिर परिसरात होणारा खाटिक समाजाचा भंडारा होणार नसल्याचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. निमगाव खंडोबा येथे देवाची पूजाअर्चा मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे.त्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे.

निमगाव व खरपुडी येथील खंडोबा मंदिर. (संग्रहित छायाचित्र )

Web Title: Yatra of Khandoba Deva at Nimgaon and Kharpadi canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.