नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:44+5:302021-04-23T04:10:44+5:30
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षीही यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला होता. यावर्षी पुन्हा ...
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षीही यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला होता. यावर्षी पुन्हा नव्याने कोरोना रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्यातच शासनाने लाॅकडाऊन सुरू केला आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता व शासनाचा आदेश असल्याने या वर्षीचा यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नवसाचे दंडवत, शेरणी वाटप, मानाच्या कावडी शिखराला लावणे आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. शासनाच्या आदेशाचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नायगावचे सरपंच हरिदास खेसे यांनी सांगितले.
२२ भुलेश्वर
नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात केलेली फुलांची सजावट.