यवतला १ कोटींचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:31 AM2017-07-30T03:31:48+5:302017-07-30T03:31:48+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावरून मुंबईकडे गुटखा घेऊन जाणाºया टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून यवत पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोमधून सुमारे एक कोटी
यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरून मुंबईकडे गुटखा घेऊन जाणाºया टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून यवत पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोमधून सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. शासनाने गुटख्यावर बंदी घातलेली असताना बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय आहे. यवत पोलिसांनी केलेली कारवाई जिल्ह्यातील मोठी कारवाई आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यवत पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार : आयशर टेम्पोमधून शासनाने बंदी घातलेला पानमसाला व गुटखा पुणे-सोलापूर महामार्गाने पुण्याकडे जात असल्याची माहिती गोडसे यांना मिळाली. पाटस टोलनाका येथे सहायक फौजदार संतोष शिंदे व सहकाºयांनी टेम्पो पकडण्यासाठी सापळा लावला. परंतु चालकाने त्यांना हुलकावणी देऊन टेम्पो सुसाट वेगात पुण्याकडे नेला. या टेम्पोचा शिंदे यांनी मोटारसायकलवरून पाठलाग केला. तसेच, त्याला अडविण्यासाठी पो. नि. गोडसे यांनी फोनवरून सहायक फौजदार वाजे यांना सूचना दिल्या. वाजे हे पोलीस ठाण्यातून बॅरिकेड लावत असतानाच संशयित टेम्पो यवतमधून भरधाव वेगाने पुढे निघाला. तेव्हा पो. नि. गोडसे हे पोलीस नाईक दीपक पालके व प्रवीण भोईटे सरकारी वाहनातून टेम्पोच्या मागावर कासुर्डी टोलनाक्याकडे निघाले. त्या वेळी कासुर्डी टोलनाका येथे लावलेली टीम व कासुर्डी टोलनाक्याचे कर्मचारी यांना सतर्क करण्यात आले. संशयित टेम्पोचा कासुर्डी टोलनाक्यापर्यंत सरकारी वाहनाने पाठलाग करून टोलनाक्यावरील टीम व टोलनाक्याचे कर्मचारी यांच्यासह टेम्पो ( एमएच ४३ वाय ५२५१) ताब्यात घेतला. टेम्पोमध्ये ड्रायव्हर सत्यपाल गोकूळराव सिंह (वय ४२, रा. बरवासी, ता. नवलगढ, जि. झुन्मुनु, राजस्थान) व त्याचा साथीदार बिरबल गोपीराम मीना यांना पोलिसांनी अटक
केली आहे.
टेम्पोमध्ये ४९ पांढºया गोण्यांमध्ये गुटखा व पानमसाला असा संशयित माल मिळून आला. हा टेम्पो पोलीस ठाण्यात आणला, टेम्पोमध्ये ४९ गोण्यांमध्ये दहा लाख पाच हजार पन्नास गोवा गुटख्याच्या पुड्या आढळल्या. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत एक कोटी पाच लाख आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक दीपक पालके, प्रवीण भोईटे, गणेश पोटे, सहफौज. शिंदे, वाजे, कॉन्टेबल संपत खबाले, गजाभाऊ खत्री, विनोद रासकर, प्रशांत कर्णवर, हरीश शितोळे यांचा सहभाग होता.